- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
crime-news-murder-case-akl-: अकस्मात मृत्यूचा बनाव करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न; LCB च्या सतर्क तपासामुळे खुनाचा उलगडा, मुख्य आरोपी ताब्यात
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
स्थानिक गुन्हे शाखेची अवघ्या ३ तासात मोठी कामगिरी
ठळक मुद्दा
डाबकी रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला | दि. ८ जुलै २०२६
अकस्मात मृत्यूचा बनाव करून खुनाचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्क तपासामुळे हाणून पाडण्यात आला. अवघ्या तीन तासांच्या वेगवान, अचूक आणि तांत्रिक तपासानंतर स्थानिक गुन्हे शाखा, अकोलाने मुख्य आरोपीला ताब्यात घेत खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केला.
ठळक मुद्दे
- अकस्मात मृत्यूच्या बनावामागील खुनाचा पर्दाफाश
- तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला अटक
- पैशांच्या व्यवहार व जुन्या वादातून खून झाल्याची प्राथमिक कबुली
काय आहे संपूर्ण प्रकरण?
८ जुलै २०२६ रोजी डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे गेट परिसरात एका अनोळखी व्यक्तीला गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालय, अकोला येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची सुरुवातीला अकस्मात मृत्यू (मर्ग क्र. ३७/२०२६) म्हणून नोंद करण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी तत्काळ तपास सुरू केला.
मृतदेहावरील जखमांमुळे वाढला संशय
शासकीय रुग्णालयात मृतदेहाची पाहणी करताना मृताच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमांचे निशाण आढळून आले. त्यामुळे हा साधा अपघात नसून घातपात असावा, असा संशय तपास पथकाला आला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची दोन विशेष पथके तयार करून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.
तांत्रिक तपासातून आरोपीपर्यंत पोहोचले
मृत व्यक्तीला रुग्णालयात आणणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत असताना तो परिसरात नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत सुरेश रतनलाल अग्रवाल (रा. मोहरीदेवी खंडेलवाल शाळे मागे, भारती प्लॉट, जुने शहर, अकोला) याला ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत आरोपीने राजू पांडुरंग इंगळे (वय ४२, रा. फडके नगर, शिवराणा चौक, डाबकी रोड, अकोला) याला पैशांच्या व्यवहारातून व जुन्या वादाच्या कारणावरून मारहाण केल्याची आणि त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक कबुली दिली.
तीन तासात खुनाचा उलगडा
स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि वेगवान कारवाईच्या बळावर अवघ्या तीन तासांत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यांनी केली कारवाई
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक माजीद पठाण तसेचपोलीस अमंलदार शेख हसन, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, रवि खंडारे, किशोर सोनोने, बसिमोद्दीन, मंगेश इंगळे, श्रीकांत पातोंड, भिमराव दिपके यांनी पार पाडली.
Akola
Akola Police
Breaking News
Crime News
Digital News
Justice
LCBAkola
Maharashtra News
Murder Case
Police Investigation
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा