raj-rajeshwar-kawad-palkhi-akl: अकोल्यात शेवटच्या श्रावण सोमवारी कावड-पालखी उत्सवाचा भक्तिमय जल्लोष!
raj-rajeshwar-kawad-palkhi-akl: अकोल्यात शेवटच्या श्रावण सोमवारी कावड-पालखी उत्सवाचा भक्तिमय जल्लोष!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
f
मुख्य सामग्रीवर वगळाभारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आदिवासी महिलेने आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी आणल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची दखल घेत विविध पक्षांच्या नेत्यांनी रुग्णालयाला भेट देत चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, शिवसेनेचे आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी आज रुग्णालयाला भेट देऊन व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
रुग्णालयातील अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची उदासीनता यावर त्यांनी सवाल उपस्थित केले.
रुग्णालय परिसरातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी असलेला वॉटर कुलर अनेक दिवसांपासून बंद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला बोलावण्यात आले. मात्र संबंधित कर्मचारी हजर न झाल्याने बच्चू कडू यांनी अधिष्ठातांसह त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
यावेळी आमदार कडू यांनी आरोग्य यंत्रणेवर सडकून टीका करत, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही सरकारी रुग्णालयांची अवस्था सुधारली नसल्याचे म्हटले. आम्ही सत्ताधारी आहोत म्हणून चुकीच्या गोष्टींवर बोलायचे नाही का, असा सवाल उपस्थित करत आगामी अधिवेशनात हा मुद्दा जोरदारपणे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य क्षेत्रासाठी पुरेशा निधीची तरतूद होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर भाष्य करत सत्तेचा लाभ काही मोजक्यांनाच मिळतो, तर जनतेच्या वाट्याला मात्र त्रासच येतो, असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी अधिष्ठातांशी संवाद साधताना आमदार कडू यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत काही अधिकाऱ्यांना राजकीय पाठबळ असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची टीका केली.
बच्चू कडू यांच्या या पाहणीमुळे रुग्णालयातील व्यवस्थापन आणि सुविधांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा