pandharpur-wari-2026-akola: पंढरीला निघालेल्या श्री संत गजानन महाराज पालखीचे कस्तुरी सामाजिक संस्थेतर्फे भव्य स्वागत; पालखीचे अकोला जिल्हयात आगमन



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 


अकोला:

ओम गजानन नमो नमः!

श्री गजानन नमो नमः !!

जय गजानन नमो नमः !

गुरु गजानन नमो नमः !!

पारंपरिक बँड व टाळ मृदुंगाच्या गजरात श्रींचा अश्व आणि श्रींची पालखी व पालखीत सहभागी झालेल्या सुमारे ७०० वारकऱ्यांच्या ताफ्यासह अतिशय भक्तीपूर्ण आणि मंगलमय वातावरणात आज श्री संत गजानन महाराजांची पालखी गायगाव वरून भौरद कडे मार्गस्थ झाली.  


वाटेत कस्तुरी या सामाजिक संस्थेतर्फे श्रींचा अश्व व श्रींच्या पालखीचे पूजन व स्वागत कस्तुरीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर बुटोले व माजी आमदार वसंतराव खोटरे यांच्या हस्ते करण्यात आले. आषाढी एकादशी निमित्त पंढरीची वारी करणाऱ्या शेगावच्या पालखीचे यंदाचे ५७ वे वर्ष असून पालखी गायगाव मार्गावरून भौरद कडे प्रस्थान करीत असताना मार्गात कस्तुरी या सामाजिक संस्थेतर्फे श्रींच्या पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले व श्रींच्या पालखीतील वारकऱ्यांना शितल जल , शितपेय व होमिओपॅथी चे औषध ' सनकुल' चे वितरण करण्यात आले.



याप्रसंगी कस्तुरीचे संस्थापक  प्रा. किशोर बुटोले, माजी आमदार वसंतराव खोटरे सर्वश्री संजय गायकवाड, राजेश्वर पेठकर, अनिता इधोळ, अमर शर्मा, घनश्याम चांडक, प्रा. डॉ. रत्ना चांडक, ॲड. अशोक शर्मा, प्रा. अनिल मुळे ,प्रा. डॉ. सीमा मुळे, वसंतराव देशमुख, डॉ. सचिन धर्माधिकारी, राम भिरड, ज्योती सुलताने, माया बुटोले, उमा कारिया , वर्षा गिरी , दामोदर नुपे , अविनाश खुंटे आदी मान्यवर उपस्थित होते.



स्थानिक होमिओपॅथी मेडिकल कॉलेज च्या प्रशासनाने ' सनकुल ' 

ही औषध सेवा उपलब्ध करून दिली यासाठी डॉ. सचिन धर्माधिकारी व डॉ. सुयोग जोहरापूरकर यांचे सहकार्य लाभले.



याप्रसंगी अनेक भक्तगणांनी श्रींच्या पालखीचे पूजन व दर्शन करून श्रींना निरोप दिला. 


शेगाव येथून निघालेल्या पालखीचे काल दुपारी पारस येथे पोहचून, अकोला जिल्ह्यात आगमन झाले असून, आज गायगाव मार्ग भौरद येथे पालखीचे आगमन झाले असून येथे पालखीचा  मुक्काम राहणार आहे. उद्या सकाळी पालखीचे आगमन डाबकी मार्गाने अकोला महानगरात होणार असून, खंडेलवाल विद्यालयात सकाळी 9 वाजताचा सुमारास पोहचणार असून, विश्रांती घेवून, पुढे मार्गस्थ होईल. त्यानंतरच शहर परिक्रमा करुन रात्री मुंगीलाल बाजोरिया विद्यालय येथे मुक्काम राहणार आहे. दुसऱ्या दिवशी शहरात पालखीचे विविध ठिकाणी स्वागत होऊन पालखीचा मुक्काम रात्री हरिहर पेठ येथील शिवाजी टाऊन विद्यालय येथे राहणार आहे. 


टिप्पण्या