cheque-bounce-case-court-akl: धनादेश अनादर प्रकरण: महिला आरोपीची निर्दोष मुक्तता; ॲड प्रवीण जामोदे यांचा प्रभावी युक्तिवाद




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: धनादेश अनादर प्रकरणात विद्यमान ८ वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एस.देशपांडे यांच्या न्यायालयाने आरोपी महिला शोभाताई गुणवंतराव महल्ले (रा. म्हाडा कॉलनी, खडकी अकोला) यांना निर्दोष मुक्त केले. या प्रकरणात आरोपीचे वकील प्रवीण जामोदे यांनी प्रभावी युक्तिवाद करीत अभ्यासपूर्ण मुद्दे न्यायालयासमोर सादर केले.


हकीकत अशी की, आरोपी शोभाताई महल्ले यांनी फिर्यादी बँक सन्मित्र अर्बन बँक अकोला यांचेकडून २,००,०००/- व्यवसाय कर्ज म्हणून घेतले होते,  आरोपी महिला सदर कर्ज परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने फिर्यादी बँकेने महिलेचा धनादेश फिर्यादीचे हक्कात वटविण्याकरीता सादर केला असता, सदर धनादेश न वटता परत आल्याने फिर्यादी बँकेने आरोपी शोभाताई महल्ले यांच्या विरूध्द  न्यायालयात कलम १३८ अंतर्गत फिर्याद दाखल केली होती. खटल्या दरम्यान फिर्यादी पक्ष आरोपीचे कायदेशीर दायित्व सिध्द न करू शकल्याने तसेच फिर्यादी बँकेने सदर धनादेश कर्जफेडीच्या मुदत पुर्व कालावधीत सादर केल्याने ८ वे अति. मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एस. देशपांडे यांच्या न्यायालयाने आरोपी महिला शोभाताई महल्ले यांची निर्दोष मुक्तता केली. 


आरोपीचे वतीने ॲड. प्रवीण जामोदे यांनी बाजु मांडली, त्यांना आकाश वानखडे व आदित्य मुरकुटे यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या