नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला, दि. 18 : नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात पुढील काही दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता वर्तविली आहे. दि. 18 मे ते 23 मे दरम्यान तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला तसेच आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उन्हामुळे शरीरातील पाण्याची कमतरता होऊ शकते. त्यामुळे तहान लागली नसली तरी वारंवार पाणी पिणे, हलके व सैल कपडे वापरणे, डोक्यावर टोपी किंवा कापड घेणे तसेच थेट उन्हात शारीरिक श्रमाची कामे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी बंद अवस्थेत ठेवू नयेत, ज्वलनशील वस्तूंपासून दूर राहावे आणि चक्कर येणे, डोकेदुखी, अशक्तपणा, जास्त घाम येणे अशी लक्षणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पशुधन आणि पाळीव प्राण्यांसाठीही सावली व पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आजचे तापमान °c
AKOLA 46.3
AMRAVATI 46.4
BHANDARA 42.6
BULDANA 43.6
BRAHMPURI --
CHANDRAPUR 43.8
GADCHIROLI 43.6
GONDIA 43.8
NAGPUR 44.4
WARDHA 46.5
WASHIM 44.0
YAVATMAL 45.4
ठळक मुद्दे :
दि. 18 ते 23 मे दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा
अकोल्यासह विदर्भातील अनेक जिल्हे अलर्टवर
दुपारी 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणे टाळण्याचे आवाहन
नागरिकांनी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला
लहान मुले, वृद्ध आणि पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा