supreme-court-ndps-case-akl: सुप्रीम कोर्टाकडून एनडीपीएस प्रकरणातील आरोपीला वैद्यकीय कारणावरून जामीन मंजूर; मुलाच्या उपचारासाठी दिलासा



ठळक मुद्दा

न्यायालयाने प्रकरणाच्या गुणवत्तेवर कोणतेही मत व्यक्त न करता केवळ वैद्यकीय कारणांचा विचार करून आरोपीला जामीन मंजूर केला.



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एनडीपीएस प्रकरणातील आरोपी संजय उर्फ संजीव परस सिंह याला सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणावरून जामीन मंजूर केला आहे. आरोपीचा मुलगा आयुष हा मेंदूतील ट्युमरने त्रस्त असून त्याच्यावर मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.



सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि न्यायमूर्ती अतुल एस. चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. आरोपी २ नोव्हेंबर २०२४ पासून न्यायालयीन कोठडीत होता. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नियमित जामीन अर्ज फेटाळला होता.



न्यायालयाने प्रकरणाच्या गुणवत्तेवर कोणतेही मत व्यक्त न करता केवळ वैद्यकीय कारणांचा विचार करून आरोपीला योग्य जामीन बंधपत्र व अटींवर जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले. तसेच सुनावणीदरम्यान आरोपीने सर्व अटींचे पालन करावे व नियमितपणे खटल्याला हजर राहावे, असेही स्पष्ट केले.



ठळक मुद्दे :

  • एनडीपीएस प्रकरणातील आरोपीला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

  • मुलाच्या मेंदूतील ट्युमर उपचाराचा विचार

  • टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

  • वैद्यकीय कारणावरून जामीन मंजूर

  • न्यायालयाने अटींचे पालन करण्याचे निर्देश दिले


टिप्पण्या