social-media-crime-viral-reel: अकोला न्यायालय परिसरात रील चित्रीकरण; आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल



ठळक मुद्दा 

न्यायालय परिसरात परवानगीशिवाय चित्रीकरण; गंभीर गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या संवेदनशील परिसरात परवानगीशिवाय व्हिडिओ चित्रीकरण करून तो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या इसमाला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तात्काळ शोधून अटक केली आहे. मात्र, या प्रकरामुळे न्यायालयीन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

06 मे रोजी विविध प्रसार माध्यमांवर एक रिल व्हिडिओ  प्रसारित झाला होता. या व्हिडिओमध्ये अकोला न्यायालय परिसरात एका व्यक्तीने दाऊद इब्राहिम या दहशतवादी नावाचा उल्लेख करून व्हिडिओ तयार केला आणि तो त्याच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. यानंतर समाजातील सुज्ञ नागरिकांच्या निदर्शनात ही रिल आली. यानंतर ही बाब गंभीर मानत पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली.

या घटनेची दखल जिल्हा व सत्र न्यायालयाने घेतली. लागलीच पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास हाती घेतला. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला  ताब्यात घेण्यात आले.

सदर आरोपी हा शेख वशीम शेख बशीर वय ३२ वर्षे रा. मोळके वाडी जुनेशहर अकोला असल्याचे निष्पन्न केले. त्याच्या विरुध्द भारतीय न्याय कलम १५२, ३५३ तथा सहकलम ६७ माहीती तंत्रज्ञान कायदयानुसार गुन्हा नोदंविला आहे.

प्राथमिक तपासात आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचेही उघड झाले असून, त्याच्यावर यापूर्वी खून, मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. दहशतवादी नावाचा वापर करून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा संबंधित कलमांतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.

सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास रामदासपेठ पोलीस करत आहेत.

सदरची कार्यवाही अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला, चंद्रकांत रेडडी अपर पोलीस अधीक्षक, सुदर्शन पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी, शहर विभाग अकोला, यांचे मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके व स्थागुशाच्या अधिकारी अंमलदार यांनी कार्यवाही केली आहे.


ठळक मुद्दे :

  • न्यायालय परिसरात परवानगीशिवाय व्हिडिओ चित्रीकरण

  • दहशतवादी नावाचा वापर करून सोशल मीडियावर व्हायरल

  • स्थानिक गुन्हे शाखेची तातडीने कारवाई, आरोपी अटक

  • आरोपीवर गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी

  • IT Act आणि IPC अंतर्गत गुन्हा दाखल




टिप्पण्या