murder-case-dabki-road-akola: चाकूने वार करून महिलेची हत्या; डाबकी रोड जकात नाका परिसरातील घटना



ठळक मुद्दा

डायल 112 च्या तत्परतेने खून प्रकरणातील आरोपी अवघ्या 10 मिनिटांत जेरबंद



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जुने शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत आज रविवारी सकाळी घडलेल्या खळबळजनक घटनेत एका महिलेवर चाकूने हल्ला करून तिची हत्या करण्यात आली. मात्र डायल 112, नागरिकांची सतर्कता आणि डाबकी रोड पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपीला अवघ्या 10 मिनिटांत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.


काय आहे संपूर्ण घटना?

रविवार दि. 17 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 8.15 वाजताच्या दरम्यान राजेश साखरे यांनी डायल 112 वर फोन करून माहिती दिली की, “जकात नाका परिसरातील त्यांचे किराणा दुकानासमोर एका इसमाने महिलेवर चाकूने वार करून जखमी केले आहे.” ही महिला डाबकी रोड कॅनॉल परिसर जकात नाका जवळील संत गोरोबा  प्रवेश द्वार समोरील जैन तेल केंद्र किराणा माल व डेली निड्स दुकानात सकाळी दूध घेण्या करिता आली होती. येथे तिचा पती व तिच्यात घरगुती वाद उफाळला. या वादातून पतीने पत्नीवर मास कापण्यास उपयोगात आणला जाणारा चाकू सारख्या धारधार शस्त्राने वार केले. यात ही महिला गंभीर जखमी झाली. यानंतर नागरिकांनी पोलिसांना लगेच माहिती दिली. माहिती मिळताच डायल 112 ने तात्काळ डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या बीट मार्शल पथकाला सूचना दिल्या. पोलीस कर्मचारी सचिन कोसे व अजय शेळके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या मंदा दीपक गुडदे (वय 45) यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


आरोपीला नागरिकांच्या मदतीने पकडले

घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी दीपक दगडू गुडदे (वय 50, रा. कलोरी ता. खामगाव जि. बुलढाणा) याला अवघ्या 10 मिनिटांत ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 303/26 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक , अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेडडी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक  दीपक कोळी, सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक अंधारे, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, एएसआय दिपक तायडे यांच्यासह उमेश पाटील,  उमेश सुगंधी, देवेद्र अवताळे, राजेश ठाकुर, सचिन कोसे, अजय शेळके यांनी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक अंधारे करीत आहे.


ठळक मुद्दे

  • जकात नाका परिसरात महिलेवर चाकू हल्ला

  • उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

  • डायल 112 च्या माहितीवर पोलिसांची तात्काळ धाव

  • आरोपी अवघ्या 10 मिनिटांत जेरबंद

  • डाबकी रोड पोलिसांची तत्पर कारवाई


टिप्पण्या