- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू; शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : जिल्हा कारागृहातील दोन विचाराधीन कैद्यांचा सलग दोन दिवसांत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रकृती बिघडल्याने दोघांनाही सर्वोपचार रुग्णालयाच्या कैदी कक्षात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच दोघांचाही मृत्यू झाला. या घटनांमुळे कारागृह प्रशासनासह पोलिस यंत्रणेतही खळबळ उडाली असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत कैद्यांपैकी दीपक रामदास चातारकर (वय ४२, रा. बेलखेड, ता. तेल्हारा) यांना २२ मे रोजी तेल्हारा न्यायालयाने एका खून प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावून जिल्हा कारागृहात पाठवले होते. सोमवार, २५ मे रोजी रात्री त्यांची अचानक प्रकृती खालावल्याने कारागृह प्रशासनाने त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवार, २६ मे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव येथील प्रल्हाद पांडुरंग रायपुरे (वय ४६) यांचीही प्रकृती अचानक बिघडली. त्यांनाही तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला. रायपुरे यांना २९ जानेवारी रोजी बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
सलग दोन दिवसांत दोन विचाराधीन कैद्यांच्या मृत्यूमुळे जिल्हा कारागृह प्रशासनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांनंतर कारागृहातील आरोग्य सुविधा आणि कैद्यांच्या वैद्यकीय तपासणी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, २०१५ मध्येही अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात चार विचाराधीन कैद्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणाने राज्यभरात मोठे लक्ष वेधले होते. आता पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने प्रशासनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
दरम्यान, सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने दोन्ही मृत्यूंची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला दिली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.
ठळक मुद्दे
- सलग दोन दिवसांत दोन विचाराधीन कैद्यांचा मृत्यू
- दोघांचाही मृत्यू उपचारादरम्यान जनरल हॉस्पिटलमध्ये
- खून प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी
- शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
- कारागृहातील आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह
- पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद, तपास सुरू
Akola
Akola Jail
Crime News
General Hospital
Jail News
Maharashtra News
Police Investigation
Undertrial Prisoners
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा