court-update-crime-news-akl: पोक्सो प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर; ॲड. अमोल सरदार यांचा यशस्वी युक्तिवाद




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जुने शहर पोलीस स्टेशन मध्ये जुलै 2025 मधे, आपल्या अल्पवयीन मुलीसोबत शेजारी राहणाऱ्या विवाहित व्यक्तीने गैरवर्तन केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली होती. तेव्हापासून आरोपी कारागृहात होता. या प्रकरण मधील आरोपीला 21 मे 2026 रोजी अकोला न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला. न्यायालयात आरोपीची बाजू ॲड.अमोल समाधान सरदार यांनी भक्कमपणे मांडून आरोपीस जामीन मिळवून दिला.


घटनेची हकीकत


एफ.आय.आर. (FIR) नुसार, दिनांक १७ जुलै २०२५ रोजी फिर्यादी (पीडितेची आई) आपल्या कामाच्या ठिकाणी उपस्थित होत्या. दुपारी १.०० वाजता, त्यांना त्यांच्या मुलीच्या शिक्षिकेचा फोन आला. शिक्षिकेने त्यांना कळवले की, त्यांच्या मुलीला अस्वस्थ वाटत असून त्यांनी शाळेत यावे. त्यानंतर, फिर्यादी शाळेत गेल्या. त्यांची मुलगी रडत त्यांच्याकडे आली. चौकशी केली असता, मुलीने सांगितले की, सकाळी साधारण ९.३० वाजता ती आपल्या शेजाऱ्याच्या (आरोपी) मुलाला शाळेत घेवून जाण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. त्याचा मुलगा अजून तयार झाला नव्हता; त्यामुळे, आरोपीने पीडितेला टाय (गळपट्टा) बांधण्यास मदत करण्यास सांगितले. त्यानुसार, पीडित मुलगी घराच्या आत गेली. त्यावेळी आरोपीने पिडीतेसोबत गैरकृत्य केले. त्यावेळी पीडित मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला सांगितले की तो तिला ५० रुपये देईल, मात्र तिने ही गोष्ट आपल्या आईला सांगू नये आणि शाळेची वेळ संपल्यावर पुन्हा त्याच्या घरी यावे. त्यानंतर, पीडित मुलीने आरोपीला ढकलले आणि स्वतःची सुटका करून घेतली.


तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्याचे कलम 8, 9 (एम ),10 आणि भारतीय न्याय संहिते चे कलम 74, 75 (1) (i) नुसार गुन्हा क्रमांक 479 /2025 नोंद होवून त्याच दिवशी आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले. तदनंतर आरोपीवर दोषारोप सुद्धा निश्चित करण्यात आले. 

     

दरम्यान, आरोपीने त्याचे अधिवक्ता  अमोल समाधान सरदार यांच्यामार्फत पहिलाच जामीन अर्ज दाखल केला. सदर जामीन अर्जाला तपास अधिकारी व पीडीतेच्या आईने लेखी स्वरूपात प्रखर विरोध केला. न्यायालयाने सरकार पक्षाचे सरकारी अभियोक्ता आणि आरोपीचे अधिवक्ता  यांचा संपूर्ण युक्तिवाद ऐकला. ॲड.अमोल सरदार यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत  विद्यमान जिल्हा न्यायधीश क्रमांक 2 Additional Sessions Judge, Akola न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला. 

टिप्पण्या