- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-city-police-robbery-case: १२ तासात जबरी चोरीचा गुन्हा उघड! भर रस्त्यात वयोवृद्धाकडून अंगठी हिसकावणारा युवक अटकेत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
अकोला सिटी कोतवाली पोलिसांची जलद कारवाई; १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला शहरात वयोवृद्ध नागरिकावर जबरी चोरी (रॉबरी) केल्याची घटना घडताच सिटी कोतवाली पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या आत आरोपीला अटक करून गुन्हा उघडकीस आणला. या कारवाईत चोरी गेलेली सोन्याची अंगठी आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १,१०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दि. ४ मे २०२६ रोजी दुपारी साडे दोनच्या सुमारास, फिर्यादी रमेश धोंडुजी केळकर (वय ७२, रा.अकोला) हे पोलीस लॉन समोर थांबले असताना, एका अनोळखी युवकाने मोटारसायकलवर येत त्यांच्या हाताला पकडून धमकी दिली.
“आरडाओरड केली तर खल्लास करीन,” अशी भीती दाखवत त्याने जबरदस्तीने त्यांच्या हातातील ४.८० ग्रॅम वजनाची सुमारे ६० हजार रुपयांची सोन्याची अंगठी हिसकावून पळ काढला.
या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३५१(२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांची झटपट कारवाई
गुन्ह्याची माहिती मिळताच डि.बी. पथकाने तातडीने तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला.
आरोपी प्रणव मोहन बिचकुंदे (वय १८, रा. अकोला) याला अटक करण्यात आली.
त्याच्याकडून चोरीची अंगठी आणि सुझुकी ऍक्सेस मोटारसायकल (MH-30-AU-8173) जप्त करण्यात आली.
पोलिसांचा सहभाग:
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच,
पोलीस निरीक्षक संजय गवई,
सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बहादुरकर व त्यांच्या पथकातील
अश्वीन सिरसाट, ख्वाजा शेख, किशोर येऊल, शैलेश घुगे, अमोल गायकवाड यांनी ही कामगिरी यशस्वी केली.
पुढील तपास पो.हवा. ख्वाजा शेख करीत आहेत.
ठळक मुद्दे
अवघ्या १२ तासांत गुन्हा उघड
७२ वर्षीय वृद्धावर जबरी चोरी
६० हजारांची सोन्याची अंगठी हिसकावली
मोटारसायकलसह आरोपी अटकेत
१.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
डि.बी. पथकाची जलद आणि अचूक कारवाई
Akola News
Akola Police
Breaking News
Crime News
Fast Action Police
Maharashtra Police
Robbery Case
Senior Citizen Safety
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा