traffic-police-case-court-verdict :वाहतूक पोलीस मारहाण प्रकरण : आरोपी शुभम माहोरे निर्दोष मुक्त; पुराव्यातील तफावत ठरली निर्णायक, न्यायालयाचा मोठा निकाल



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : शहर वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप असलेल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी शुभम पुंडलीक माहोरे याची निर्दोष मुक्तता केली आहे. पुरावे व साक्षीदारांच्या जबाबांमध्ये आढळलेल्या तफावतींमुळे न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीची बाजू ॲड. पप्पू मोरवाल यांनी सक्षमपणे मांडली.


प्रकरण काय होते?

पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे दि. 22.04.2018 रोजी वाहतुक पोलीस अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल सचिन बाबराव मात्रे यांनी तक्रार दाखल केली होती की, दिनांक 22.04.2018 रोजी ते बस स्टॅण्ड समोर ड्युटीवर असतांना ऑटो रिक्षा क्रमांक एम.एच.30 बी. सी. 1116 चा चालक मालक शुभम पुंडलीक माहोरे याने त्याचे वाहन भरगाव वेगाने चालवून सिग्नल तोडले व त्याला थांबवले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस फिर्यादी सचिन मात्रे यांच्या सोबत पोलीस कॉन्स्टेबल सोळंके यांनी पाठलाग करून थांबवले असता आरोपी शुभम माहोरे याने भांडण केले, व ऑटो रिक्षा मधील लोखंडी रॉड काढून सचिन मात्रे यांच्या डोक्यावर मारले. त्यामुळे डोक्याला मार लागला व त्यावेळेस वाहतुक पोलीस अधिकारी सचिन मात्रे यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 120/2018 प्रमाणे भारतीय दंड विधान  कलम 353, 186, 332, 506 व मोटर वाहन कायद्याचे कलम 185, 119, 117, 130 (2) (177) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.



न्यायालयातील सुनावणी

  • प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला येथे चालले

  • फिर्यादी सचिन मात्रे, साक्षीदार हरीदास सोळंके व इतरांची साक्ष नोंदविण्यात आली

  • साक्षीदारांनी प्रकरणाशी संबंधित माहिती दिली


बचाव पक्षाचा युक्तिवाद ठरला प्रभावी

सदरहु प्रकरण हे जिल्हा व सत्र न्यायालय अकोला यांच्या समोर चालले असता, आरोपी शुभम माहोरे याची बाजू ॲड. पप्पू मोरवाल व ॲड. प्रवीण राजाराम तायडे यांनी मांडली. 

या प्रकरणामध्ये फिर्यादी सचिन मात्रे, साक्षीदार हरीदास सोळंके व इतर साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. सर्व साक्षीदार प्रकरणाला जोडून राहले. परंतु आरोपीचे वकिल ॲड. पप्पू श्रीराम मोरवाल व ॲड. प्रविण राजाराम तायडे यांनी चाणक्य बुद्धीचा प्रयोग करून उत्तमरित्या उलटतपास घेवून तपास व पुराव्यामध्ये तफावत असल्याचे न्यायालयासमोर आणले. ॲड. पप्पू मोरवाल व ॲड. प्रविण तायडे यांच्या जोरदार युक्तीवादातील मुद्दे ग्राह्य धरून  न्यायालयाने आरोपी शुभम माहोरे याची या प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता केली. 


आरोपीच्या वतीने:

  • ॲड. पप्पू मोरवाल

  • ॲड. प्रविण राजाराम तायडे

यांनी जोरदार युक्तिवाद केला.

उलटतपासणीदरम्यान:

  • तपासातील त्रुटी उघड झाल्या

  • साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती दिसून आली

  • पुराव्यांमध्ये स्पष्ट तफावत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले


न्यायालयाचा निकाल

न्यायालयाने:

  • पुराव्यांमध्ये सुसंगती नसल्याचे मान्य केले

  • शंका निर्माण होईल अशी परिस्थिती असल्याचे नमूद केले

  • आरोपी शुभम माहोरे याला निर्दोष मुक्त केले


सहकार्य करणारे

या प्रकरणात बचाव पक्षाला ॲड. सुनिल सरदार, ॲड. गणेश खेळकर, ॲड. सुनिल दिवनाळे, सौरभ डाहाके, प्रणव वानखडे, श्रवण राठोड आदींनी सहकार्य केले.


ठळक मुद्दे

  • 2018 मधील वाहतूक पोलीस मारहाण प्रकरण

  • 8 वर्षांनंतर न्यायालयाचा निकाल

  • पुराव्यातील तफावत ठरली निर्णायक

  • आरोपीची निर्दोष मुक्तता

  • तपासातील त्रुटींवर न्यायालयाची नोंद




टिप्पण्या