murder-mystery-crime-news-: अज्ञात महिलेच्या जळीत प्रकरणाचा उलगडा! पतीच ठरला खुनी…

  प्रतीकात्मक चित्र 


पत्नीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत जाळले; आरोपीची धक्कादायक कबुली



ठळक मुद्दे 

(News Highlights)

  • अज्ञात जळीत प्रेत प्रकरणाचा २ दिवसांत उलगडा

  • पतीच निघाला पत्नीचा खुनी

  • प्रेमविवाहानंतर सतत वादातून घडली घटना

  • आरोपीची स्वतःहून पोलिसांकडे कबुली

  • पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत जाळले




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: डाबकी रोड परिसरात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या अर्धवट जळीत प्रेताच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, या प्रकरणात महिलेचा पतीच खुनी असल्याचे समोर आले आहे. आरोपीने स्वतः पोलिसांसमोर हजर होत पत्नीचा खून करून प्रेत जाळल्याची कबुली दिल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.


घटना काय होती?

दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी डाबकीरोड पोलीस स्टेशन हद्दीत, अन्नपूर्णा माता मंदिराजवळील लेआऊटमध्ये एका महिलेचे अर्धवट जळालेले प्रेत आढळून आले.

  • चेहरा पूर्णतः जळाल्याने ओळख पटत नव्हती

  • परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते



दिनांक ०६/०४/२०२६ रोजी पोलीस स्टेशन डाबकीरोड परिसरातील अन्नपुर्णा माता मंदीराचे बाजुला असलेल्या लेआऊट मध्ये एका स्त्री चे अर्धवट जळालेले प्रेत मिळुन आले होते. प्रेताचा चेहरा जाळुन प्रेताची ओळख पटणार नाही अशा अवस्थेत प्रेत मिळुन आले होते. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन  पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानीक गुन्हे शाखा, अकोला, पोलीस निरीक्षक दिपक कोळी पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोला यांनी घटनास्थळी भेट देवुन, मृतक महिलेची ओळख पटवुन घेण्यासाठी व मारेक-यांचा शोध घेण्यासाठी स्थानीक गुन्हे शाखा, अकोला येथील पथक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथक, तसेच पोलीस स्टेशन डाबकीरोड येथील पथक नियुक्त करण्यात आले होते.



तपासाची दिशा

या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली.

  • परिसरातील CCTV फुटेज तपासले

  • शहरातील मिसिंग प्रकरणांची पडताळणी

  • सोशल मीडियावर शोधपत्रिका व्हायरल

तरीही सुरुवातीला कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती.



सदर प्रकरणाचे तपास परिसरातील सि.सि.टी.व्ही. फुटेज चेक करण्यात आले असता, संशयीत फुटेज स्थानीक गुन्हे शाखा, अकोलाच्या पथकाचे ताब्यात आले होते. परंतू, आरोपीचे ओळख पटली नव्हती, शहरातील पोलीस स्टेशन मधील मिसींग तपासण्यात आले परंतु मयत स्त्री बाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती. त्यामुळे सदर मयत स्त्रीची ओळख पटविण्याकरिता शोध पत्रिका शहरातील विविध व्हॅट्सअप ग्रुप व ईतर समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आले. 



आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात!

८ एप्रिल रोजी सादीक शहा तसरीफ शहा (वय २९, रा. नांदखेडा, जि. वाशिम) हा स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला.

  • पत्नी रविना मोहन पवार (वय २४) हिचा खून केल्याची कबुली

  • मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न



यादरम्यानच आज दिनांक ०८/०४/२०२६ रोजी संशयीत आरोपी  सादीक शहा तसरीफ शहा वय २९ वर्ष रा. नांदखेडा, ता. मंगरूळपीर जि. वाशिम याने पोलीस स्टेशनला हजर येवुन त्याची पत्नी रविना मोहन पवार वय २४ वर्ष हिचा सोबत वाद होवुन तिचा खुन केल्याचे कबुली करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचे सांगितले.


प्रेमविवाह, पण शेवट दुर्दैवी…

  • आरोपी व मृत महिला यांचा प्रेमविवाह होता

  • रविनाचे हे दुसरे लग्न

  • दोघांमध्ये सतत घरगुती वाद

  • काही दिवसांपूर्वीच अकोल्यात भाड्याच्या घरात वास्तव्यास

  • रविनाने नुकतेच बाळाला जन्म दिला होता

घटनेच्या रात्री वाद वाढल्याने आरोपीने रागाच्या भरात पत्नीचा खून केला.



आरोपी आणि मयत स्त्री यांचा प्रेम विवाह होता, रविना मोहन पवार हिचे हे दुसरे लग्न होते. त्यांच्यात सतत वाद होत होते. घटनेच्या रात्री रागाच्या भरात आरोपी सादीक शहा कडुन पत्नीचा खुन करण्यात आला.  


खुनानंतरची थरारक कृती

  • मृतदेह घटनास्थळी नेऊन जाळण्यात आला

  • ओळख पटू नये म्हणून चेहरा जाळण्याचा प्रयत्न



आरोपीने पुरावा नाहिसा करण्याचे उद्देशाने प्रेत घटनास्थळावर आणुन जाळल्याची कबुली दिली असुन पि.एम. रिपोर्ट अप्राप्त आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन डाबकीरोड पोलीस करीत आहे.



पुढील कारवाई

  • आरोपीला न्यायालयासमोर हजर केले जाणार

  • पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्रतीक्षेत

  • पुढील तपास डाबकीरोड पोलीस करत आहेत



आरोपी आणि मयत स्त्री रविना हे काही वर्ष मुंबई येथे वास्तव्यास होते. त्यानंतर ते काही दिवसांपूर्वी अकोला येथे आले व भाडेचे घरात राहू लागले. दरम्यान रविनाने बाळास जन्म दिला. मात्र काही कारणास्तव या दाम्पत्य मध्ये वाद होवू लागले. या वादाचा शेवट रविनाच्या दुर्दैवी मृत्युने झाला, अशी माहिती समोर आली आहे. आरोपीला उद्या न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


पोलिसांची महत्त्वाची भूमिका

या प्रकरणाचा उलगडा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
तसेच स्थानिक गुन्हे शाखा व डाबकीरोड पोलीस स्टेशनच्या पथकाने तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.



सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक  अर्चित चांडक अकोला, अपर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी , जि अकोला, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला सुदर्शन पाटील, पोलीस निरिक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपक कोळी पोलीस स्टेशन डाबकीरोड अकोला. सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक अंधारे पोलीस उप निरिक्षक अनिल चव्हाण तसेच स्थानीक गुन्हे शाखा, अकोला येथील पथक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथक, तसेच पोलीस स्टेशन डाबकीरोड येथील पथक यांनी केली.

टिप्पण्या