- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल; पोक्सो कायद्यांतर्गत कठोर कारवाई
ठळक मुद्दे
आरोपी प्रल्हाद उत्तम हजारे यास ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा
भा.दं.वि. कलम ३५४ अंतर्गत १ वर्ष सक्त मजुरी व दंड
पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवत कठोर शिक्षा
२०१७ मधील प्रकरणात न्यायालयाचा अंतिम निकाल
६ साक्षीदारांच्या साक्षींवर आधारित निर्णय
पीडितेस ‘मनोधैर्य’ योजनेतून नुकसान भरपाई
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अल्पवयीन मुलीवर जबरी अत्याचार केल्याप्रकरणी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ ए. डी. क्षीरसागर यांनी आरोपी प्रल्हाद उत्तम हजारे (रा. कासमार, ता. बार्शिटाकळी) यास दोषी ठरवत ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच या प्रकरणात पीडितेला ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाने भा.दं.वि. कलम ३५४ अंतर्गत १ वर्ष सक्त मजुरी व ५०० रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली. याशिवाय पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १० अंतर्गत ५ वर्ष सक्त मजुरी व १००० रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा देण्यात आली.
ही घटना दिनांक ९ जुलै २०१७ रोजी घडली होती. पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जबरी अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीविरुद्ध भा.दं.वि. व पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पीएसआय मनोज वासाडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. फिर्यादी, पीडिता आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
सरकार पक्षाची बाजू अतिरिक्त सरकारी वकील राजेश आकोटकर यांनी प्रभावीपणे मांडली. तसेच एएसआय फजलुर रहमान काजी आणि एएसआय प्रकाश खाडे यांनी प्रकरणाच्या पाठपुराव्यात सहकार्य केले.
.
News Keywords
अकोला कोर्ट निकाल,
पोक्सो केस अकोला,
अल्पवयीन मुलीवर अत्याचार,
Akola POCSO case judgement,
district court Akola news
Akola Court Child Safety
Akola News
Breaking News
Court Judgement
Crime News
Justice
Legal Update
Maharashtra News
POCSO Case
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा