India-heat-wave-akola-vidarbha :देशभर उष्णतेचा कहर; अकोला ठरला देशातील सर्वाधिक तापमानाचा ‘हॉटस्पॉट’!





ठळक मुद्दा 

विदर्भात तापमान 47°C च्या उंबरठ्यावर; अकोला, अमरावती, वर्धा येथे ऑरेंज अलर्ट — नागरिकांना दुपारी बाहेर पडू नका असा इशारा




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: देशभर सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली असून ईशान्य भारत वगळता जवळपास सर्व राज्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अनेक ठिकाणी तापमान 46 ते 47 अंशांच्या घरात पोहोचले असून नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे.


विदर्भात उष्णतेचा उच्चांक — अकोला अव्वल!


रविवारी अकोल्यात तब्बल 46.9°C तापमानाची नोंद झाली असून हे देशातील सर्वाधिक तापमान ठरले. त्यामुळे अकोल्याने “Hottest City in India” मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. तर आज, सोमवार (27 एप्रिल 2026) रोजी अकोल्याचे तापमान 46.3°C नोंदविण्यात आले.


विदर्भ आजचे तापमान




अकोल्यापाठोपाठ काल अमरावती (46.8°C) तर आज विदर्भात सर्वाधिक 46.6 सेल्सिअस तापमान अमरावतीचे आहे. वर्धा जिल्ह्यात काल 46.4°C तापमान नोंदले गेले तर आज 46.5 तापमान नोंदविले आहे.


विदर्भातील प्रमुख तापमान नोंदी : (रविवार 26 एप्रिल)

  • अकोला – 46.9°C

  • अमरावती – 46.8°C

  • वर्धा – 46.4°C

  • यवतमाळ – 46.0°C

  • नागपूर – 45.4°C

  • गडचिरोली – 44.6°C

  • वाशीम – 44.6°C

  • गोंदिया – 44.4°C

  • भंडारा – 44.0°C

  • चंद्रपूर – 44.0°C

  • बुलढाणा – 43.5°C

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 44°C पेक्षा अधिक असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.


हवामान विभागाचा इशारा :

भारतीय हवामान विभागाने अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच 26 ते 28 एप्रिल दरम्यान यलो अलर्ट देण्यात आला असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


तापमानाचा वाढता ट्रेंड (अकोला) :

  • 19 एप्रिल : 45°C

  • 20 एप्रिल : 43.2°C

  • 21 एप्रिल : 43.6°C

  • 22 एप्रिल : 43.7°C

  • 23 एप्रिल : 44.3°C

  • 24 एप्रिल : 45°C

  • 25 एप्रिल : 45.6°C

  • 26 एप्रिल : 46.9°C

  • 27 एप्रिल : 46.3°C

यावरून उष्णतेचा पारा सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट दिसते.


इतर भागांतील परिस्थिती :

गोंदिया जिल्ह्यात तापमान 44.5°C पर्यंत पोहोचले असून नागरिक हैराण झाले आहेत. पुणे शहरातही तापमान 40°C पार गेले. 


प्रशासनाचे आवाहन :


उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत —

  • दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळा

  • भरपूर पाणी प्या

  • उन्हात जाणे टाळा

  • हलके व सूती कपडे वापरा

  • लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या


ठळक मुद्दे :

  • देशभर तापमान 40°C पार, विदर्भात सर्वाधिक उष्णता

  • अकोला 46.9°C सह देशातील सर्वात उष्ण शहर

  • अमरावती दुसऱ्या क्रमांकावर

  • अनेक जिल्ह्यांमध्ये 46°C च्या पुढे तापमान

  • हवामान विभागाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

  • पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार



ही उष्णतेची लाट पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे.


टिप्पण्या