- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file image
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून विदर्भात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. मंगळवारी अकोला येथे ४४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे सर्वाधिक होते. तर बुधवार १५ एप्रिल रोजी विदर्भातील अकोला जिल्हा सर्वाधिक हॉट ठरला असून तापमान ४४.२ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. अमरावतीचे तापमान ४४ अंश सेल्सियस नोंदविले गेले. नागपूर, वर्धा जिल्ह्यातील तपामान देखील ४० अंश वर पोहचले आहे. हीच स्थिती जवळपास सर्व जिल्हाची आहे.
Minimum temperature 25.3°C
Maximum temperature 44.2°C
मागील काही दिवसांपासून सातत्याने उन्हाचा पारा चढत असल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर सुद्धा झाला आहे. दुपारच्या वेळी रस्ते, बाजारपेठा ओस पडत असून उन्हाची तीव्रता जीवघेणी ठरत आहे.
मागील दोन दिवसांपासून अंगाला चटके लागतील एवढी उन्हाची तीव्रता वाढली असून उन्हापूर्वीच आपली कामे करण्यावर नागरिकांचा भर आहे. तर सायंकाळनंतर ग्राहक बाजारपेठेत येत असल्याचे दिसून येत आहे. दुपारी शहरातील रस्ते, बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात उष्माघात उपाययोजनांबाबत आढावा
उष्माघात दक्षतेबाबत जनजागृती करा; यंत्रणा सुसज्ज ठेवा
जिल्हाधिका-यांचे निर्देश
अकोला जिल्ह्यात वाढते तापमान, उष्मालाटेचा इशारा लक्षात घेता दक्षतेबाबत प्रभावी जनजागृती करावी, तसेच सर्व रूग्णालये, यंत्रणा सुसज्ज ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.
उष्माघात उपाययोजनांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
प्रत्येक आरोग्य संस्थेत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यात शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्रा. आ. केंद्र येथे 137 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ओआरएस व औषधसाठा पुरेसा ठेवावा. त्याचप्रमाणे, नागरिकांमध्ये उष्माघातापासून दक्षता बाळगण्याबाबत प्रभावी जनजागृती करावी. ग्रामीण भागात दवंडी देऊन जनजागृती करावी महापालिका क्षेत्रात कचरा घंटागाडीमार्फत माहिती द्यावी. त्याचप्रमाणे, शहरात व जिल्ह्यात होर्डिंग्ज, सूचना, ध्वनीचित्रफीती आदींद्वारे प्रभावी जनजागृती करावी. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
कामगारांसाठी आस्थापनांनी पेयजल, कुलर आदी सुविधा ठेवाव्यात. उन्हात काम करणे टाळावे. उन्हात जास्त वेळ श्रमाची कामे करणे, कारखान्यांच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काच कारखान्यांतील कामे किंवा जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. पाच वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णाचे शरीर तापमान कमी करण्यासाठी जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत. शरीराला घाम येणे, जास्त तहान लागणे, त्वचा कोरडी पडणे, १०२ अंशांपेक्षा जास्त ताप येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, अस्वस्थता, उलटी किंवा बेशुद्धावस्था ही उष्णतेमुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. डॉ. मेश्राम, आर डी सी मालथने,डॉ.जावेद खान आदी उपस्थित होते.
उष्माघात टाळण्यासाठी उपाय:
* डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा.
* हलक्या रंगाचे सुती कपडे घालावेत.
* दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घरातच राहावे.
* भरपूर पाणी पिण्यासोबत ताक, लिंबूपाणी, नारळपाणी यांचे सेवन करावे.
टाळावयाच्या गोष्टी:
* दुपारी १२ ते ४ दरम्यान उन्हात काम करणे टाळावे.
* अनवाणी उन्हात चालू नये.
* लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद गाडीत ठेवू नये.
* मद्य, चहा, कॉफी व जास्त साखरयुक्त किंवा कार्बोनेटेड पेये टाळावीत.
आरोग्य विभागामार्फत पोस्टर, बॅनर आणि हस्तपत्रिकांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. उष्माघात टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी केले आहे.
१२ मे पर्यंत उष्मा
सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत कोणीही बाहेर (विशेषतः मोकळ्या जागांमध्ये) जाऊ नये. हवामान खात्याने सांगितले आहे की तापमान ४५°C ते ५५°C पर्यंत वाढू शकते. जर कोणाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा अचानक अस्वस्थ वाटत असेल, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वायुवीजनासाठी खोल्यांचे दरवाजे उघडे ठेवा. मोबाईल फोनचा वापर कमीत कमी करा, अति उष्णतेमुळे स्फोट होण्याचा धोका आहे.
दही, ताक आणि विड्याच्या पानांचा रस यांसारखी थंड पेये भरपूर प्या.
नागरी संरक्षण विभाग जनतेसाठी आणि रहिवाशांसाठी खालील सूचना जारी करत आहे.
येत्या काही दिवसांत तापमान ४७°C ते ५५°C पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
अशी घ्यावी खबरदारी
गाडीत ठेवू नये अशा वस्तू
गॅसची उपकरणे
लायटर्स
कार्बनयुक्त पेये
सुगंध आणि बॅटरी
हवा खेळती राहण्यासाठी गाडीच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा
गाडीची इंधन टाकी पूर्णपणे भरू नका
इंधन टाकी संध्याकाळी भरा
सकाळी गाडीने प्रवास करणे टाळा
प्रवास करताना टायरमध्ये जास्त हवा भरू नका
इतर खबरदारी
विंचू आणि साप थंड ठिकाणी घरात येऊ शकतात, त्यामुळे काळजी घ्या
भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ प्या
गॅस सिलेंडर उन्हात ठेवू नका
विद्युत मीटरवर जास्त भार टाकू नका
एअर कंडिशनिंगचा वापर फक्त आवश्यक खोल्यांमध्येच करा
दर २-३ तासांनी किमान ३० मिनिटांची विश्रांती घ्या
जेव्हा बाहेरील तापमान ४५-४७°C असेल, तेव्हा एसी २४-२५°C वर सेट करा
सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत थेट सूर्यप्रकाश टाळा.
40 degrees Celsius
Akola
Amravati
heat
highest recorded
hottest spot
Nagpur
temperatures
Vidarbha region
Wardha
Wednesday
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा