- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
court-news-cheque-dishonor-: धनादेश अनादर प्रकरणी आरोपी महिलेला पंच्याहत्तर हजार रुपये दंड व १ महिन्याचा कारावास
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: दवाखान्याचे काम असल्याचे सांगून सिंधी कॅम्प खदान येथील रहीवासी असलेल्या एका महिलेने फिर्यादी कडून ६० हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, वारंवार पैसे परत मागूनही मिळत नसल्याने अखेर फिर्यादीने न्यायालयात दाद मागितली. ११ वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अकोला यांनी आरोपी महिला विरुद्ध निगोशिएअबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम 138 नुसार गुन्हा सिद्ध झाल्याचे सांगुन आरोपीस पंच्याहत्तर हजार रुपये दंड केला. व १ महीना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. नुकसान भरपाई म्हणून दंडाची रक्कम फिर्यादीस देण्याचे आदेश पारीत केले.
फिर्यादी गजानन रामभाऊ गोलाईत यांच्या कडून आरोपी महिला हिने दवाखान्याचे कामाने ६० हजार रुपये उसने मागितले होते. फिर्यादीने आरोपीस प्रथम ४०,००० हजार व त्यानंतर २०,००० असे एकूण ६० हजार चेक व्दारे स्वतःचे बँक खात्यातून दिले. रक्कम लवकरच परत देते, असे आश्वासन आरोपीने दिले. फिर्यादीने तीन-चार महीने नंतर आरोपीस दिलेल्या रकमेची मागणी केली.
वारंवार मागणी केल्यावर आरोपीने ६० हजार रुपयाचा धनादेश उत्कर्ष स्माॅल या बँकेचा दिला. धनादेश देते वेळी सदरचा धनादेश नक्कीच वटविल्या जाईल, असे आश्वासन आरोपीने दिले. तो धनादेश फिर्यादीने स्वतःचे बँक खात्यात लावले असता न वटता 'पुरश्या निधी अभावी परत' अश्या बँक शेरासह परत आला.
यानंतर फिर्यादीने ॲड. विद्याधर सरकटे यांचे मार्फत रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. परंतु आरोपीने रक्कम दिली नाही; म्हणुन फिर्यादीने अकोला येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली. त्यामध्ये फिर्यादीने स्वतःचा पुरावा नोंदविला.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपलेवर ११ वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी २ एप्रिल रोजी आरोपी विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम 138 (पराक्रम्य लेख अधिनियम) नुसार गुन्हा सिद्ध झाल्याचे सांगुन आरोपीस दोन लक्ष पाच हजार रुपये दंड ठोठावला. व १ महीना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. नुकसान भरपाई म्हणून दंडाची रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये फिर्यादीस देण्याचे आदेश पारीत केले. न्यायालयात फिर्यादीची बाजू वकील विद्याधर सरकटे यांनी मांडली.
ॲड विद्याधर सरकटे
akola court
Chief Judicial Magistrate
imprisonment
legal recourse
Negotiable Instruments Act
Section 138
sentenced
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा