raj-rajeshwar-kawad-palkhi-akl: अकोल्यात शेवटच्या श्रावण सोमवारी कावड-पालखी उत्सवाचा भक्तिमय जल्लोष!
raj-rajeshwar-kawad-palkhi-akl: अकोल्यात शेवटच्या श्रावण सोमवारी कावड-पालखी उत्सवाचा भक्तिमय जल्लोष!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
f
मुख्य सामग्रीवर वगळाभारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : माजी मंत्री व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अॅड. यशोमती ठाकूर यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षावर तीव्र टीका केली आहे. “संविधानाला अपमानित करण्यासाठी चुकीचे नेरेटिव्ह पसरवले जात असून २०१४ पासून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
स्वराज्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनाची रूपरेखा जाहीर केली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपच्या तथाकथित ‘नारी वंदना’ विधेयकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“नारी वंदना” महिला बिल नेमके कुठे गेले? — ठाकूर यांचा सवाल
हे महिला आरक्षणासाठी नसून मतदारसंघ पुनर्रचनेसाठीचे बिल असल्याचा आरोप
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिलाचा अट्टाहास का?
प्रथम जातीनिहाय जनगणना व डी-लिमिटेशन आवश्यक — ठाकूर यांची भूमिका
एससी, एसटी, ओबीसी आरक्षण टाळण्यासाठीच हा डाव असल्याचा आरोप
“जनतेला भाजपचे नाटक समजले आहे” — काँग्रेसचा दावा
देशभर महिला बिलावर काँग्रेस आंदोलन छेडणार
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “महिला आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असला तरी त्याआधी जातीनिहाय जनगणना व मतदारसंघांची योग्य पुनर्रचना (डी-लिमिटेशन) होणे आवश्यक होते. त्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन व्हायला हवा होता. मात्र, तसे न करता भाजपने आपल्या सोयीसाठी प्रक्रिया राबवून जनतेचा विश्वासघात केला.”
त्या पुढे म्हणाल्या, “आज देशातील महिला ज्या ताठ मानेने विविध पदांवर कार्यरत आहेत, ती काँग्रेसची देण आहे. भाजप केवळ दिखाऊ राजकारण करत आहे.”
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेसने देशभर आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा