asha-bhosale-passed-away-: चिरतरुण आवाजाने अवघ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले काळाच्या पडद्याआड …

सर्व संग्रहित छायाचित्र...


भारतीय अलंकार न्यूज 24

नीति वत्स 

मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. आशा भोसले यांच्या सदाबहार गीतांनी आठ दशकांपासून रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. आपल्या चिरतरुण आवाजाने अवघ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले काळाच्या पडद्याआड गेल्याने भारतीय सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. शनिवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले होते.


रविवारी सकाळी आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी यासंदर्भातील माहिती दिली. तसेच उद्या (१३ एप्रिल) दुपारी ४ वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर सोशल मीडियावर असंख्य चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


अनेक पुरस्कारांनी सन्मानित


आशा भोसले यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. 

२००८ मध्ये पद्मविभूषण. 

२००० मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि दोनदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित. 

१९८१ आणि १९८६ मध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार. सात वेळा फिल्मफेअर पुरस्कार. 

१९९६ मध्ये, त्यांना 'रंगीला' चित्रपटासाठी फिल्मफेअर विशेष पुरस्कार मिळाला होता. 

२००१ मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार. 

२००२ मध्ये 'लगान' चित्रपटासाठी आयफा पुरस्कार.  

१९८७ मध्ये 'नाईटिंगेल ऑफ एशिया' पुरस्कार. 

२००० मध्ये 'सिंगर ऑफ द मिलेनियम' (दुबई).  

२००२ मध्ये 'बीबीसी जीवनगौरव पुरस्कार'.



वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत


आशा भोसले यांच्या संगीतातील कराकिर्दीत त्या अतुच्च शिखरावर पोहचल्या होत्या. मात्र, त्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होत्या. त्यांचे पहिले लग्न गणपतराव भोसले यांच्याशी झाले होते. या लग्नादरम्यान त्यांना मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागले. हे लग्न फार काळ टिकले नाही. त्यानंतर त्यांनी आर. डी. बर्मन यांच्याशी लग्न केले होते.  


वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार


आशा भोसले यांनी वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. मात्र त्या कधीच डगमगल्या नाहीत. सर्व परिस्थितीवर मात देवून त्यांनी आपल्या सुरेल आवाजात अनेक अजरामर गाणी  दिली. आपल्या वयक्तिक आयुष्याचा परिणाम व्यावसायिक जीवनावर त्यांनी कधीच होवू दिला नाही. त्यांची मुलगी वर्षा हिने आत्महत्या केली होती, तर मुलगा हेमंत भोसले यांचं कर्करोगामुळे निधन झालं. त्यांचा दुसरा मुलगा आनंद भोसले आहे. त्यांची नात जनाई भोसले ही देखील गायिका आहे. 


महान मंगेशकर कुटुंबीय


8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रात जन्मलेल्या आशा भोसले या लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहिण आहेत. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे अभिनेते व गायक होते. तर आई शिवार्ताई मंगेशकर गृहिणी होत्या. पंडित हृदयनाथ मंगेशकर, मीना मंगेशकर, उषा मंगेशकर हे त्यांचे भावंडं. भारतीय सिनेसृष्टीत मंगेशकर कुटुंबीयांनी अमूल्य आणि अभूतपूर्व योगदान दिले आहे.



आशा भोसले यांची अजरामर गाणी 


गोमू संगतीनं माझ्या, जांभूळ पिकल्या झाडाखाली, रुपेरी वाळूत माडाच्या बनात, धुंदी कळ्यांना चंद्र आहे साक्षीला, दिस जातील दिस येतील, नभ उतरू आलं, चुरा लिया है तुमने जो दिल को, दम मारो दम, दिल चीज क्या है, इन आँखों की मस्ती, पिया तू अब तो आजा, आओ हुजूर तुमको… असे अनेक गाणी त्यांनी गायिली. महान गायक मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्या सोबत गायिलेली गाणी आजही तेवढेच लोकप्रिय आहेत. नवी पिढी सुद्धा त्यांच्या गाण्यांची आणि सुरेल आवाजाचे दिवाने  आहेत.


आशा भोसले यांनी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी 1943 मध्ये मराठी गाण्यांपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हिंदीसह विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली. त्यांच्या गाण्यांनी अनेक दशकं संगीतप्रेमींवर अधिराज्य गाजवलं आहे. आणि गाजविणार… अश्या महान गायिकेला भारतीय अलंकार न्यूज 24 परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली…

टिप्पण्या