army-jawan-murder-case-akl: आर्मी जवानच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपी अंकित उर्फ छोटू विठ्ठल खंडारे याचा जामीन मंजुर




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जुने शहर पोलीस ठाणे हद्दीत मार्च 2026 मध्ये घडलेल्या आर्मी जवानच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपी अंकित उर्फ छोटू विठ्ठल खंडारे याचा अकोला न्यायालयाने जामीन अर्ज मंजुर केला. न्यायालयात आरोपीची बाजू ॲड. पप्पू  श्रीराम मोरवाल यांनी मांडली.



घटनेची हकीकत

पोलीस स्टेशन जुने शहर येथे दि. 25.03.2026 रोजी फिर्यादी दिलीप दयाराम तेलगोटे रा. जुने शहर, अकोला यांनी तक्रार दिली होती की, त्यांचा मुलगा सुशिल दिलीप तेलगोटे हा आर्मी मध्ये कार्यकरत असून तो दि. 22.03.2026 रोजी 7 दिवसाच्या सुटीवर आला होता. दि. 24.03.2026 रोजी सुशिल तेलगोटे हा घरी हजर असतांना त्याच्या घराच्या शेजारी राहत असलेले जय मुरेकर याने फोन केला व थोड्या वेळाने जय मुरेकर, यशवंत ठाकुर, बाळा सोलापूरे हे मोटर सायकलने घरी आले व सुशिल तेलगोटे याला घेउन निघुन गेले. मुलगा घरी परत न आल्याने फिर्यादीने मुलाच्या मोबाईलवर फोन केले. त्यानंतर रात्री 10.45 च्या सुमारास आरोपी जय मुरेकर याने घरी फोन करून सुशिल तेलगोटे बद्दल विचारले व त्यानंतर पुन्हा 11.00 वाजता फोन करून सांगितले की, सुशिल स्मशान भुमीकडे पडलेला आहे. महिती मिळाल्यामुळे आईवडील व इतर नातेवाईक समशान भुमीकडे गेले असता सुशिल तेलगोटे हा रक्त बंबाळ व बेशुद्ध अवस्थेत दिसला व त्याला मार लागल्याचे दिसले. म्हणून त्याला आयकॉन हॉस्पीटल येथे भरती केले असता तो मरण पावला. अशा तक्रारीवरून जुने शहर पोलीस अधिकाऱ्यांनी अपराध क. 507/2026 कलम 109 (1), 103 (1), 3 (5) भारतीय न्याय संहितेच्या सह कलम 3(2) (5) अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार गुन्हा दाखल केला होता व त्यानुसार सदरहु गुन्ह्यामध्ये यशवंत ठाकुर, जय मुरेकर, निलेश सोलापूरे, अंकित उर्फ छोटू विठ्ठल खंडारे यांना दि. 28.03.2026 रोजी अटक केली होती व त्यानंतर पासून सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत होते.


ॲड. पप्पू मोरवाल यांचा युक्तिवाद 

सदरहु गुन्ह्यातील आरोपी अंकित उर्फ छोटू विठ्ठल खंडारे याने ॲड. पप्पू श्रीराम मोरवाल यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला येथे जमानत मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. सदरहु अर्जास तपास अधिकारी व सरकारी वकील यांनी जोरदार विरोध केला की, सदरहु गुन्हा हा हत्त्याचा असून अत्यंत क्रूर व गंभिर स्वरूपाचा आहे व मृतक हा भारतीय सैन्य दालातील जवान होता. तसेच सदरहु गुन्ह्यात अनुसुचित जाती जमाती अधिनियमचे कलम वाढ करण्यात आल्यामुळे तपास अजुन बाकी आहे व तसेच अद्याप तपास अपूर्ण असून जामीन दिल्यास अडथळा निर्माण होउन पुरावे नष्ट होण्याची दाट शक्यता आहे. परंतु ॲड. पप्पू श्रीराम मोरवाल यांनी आरोपी यांची बाजू जोमाने धरून चांगल्या प्रकारे युक्तीवाद केल्यामुळे आरोपी अंकित उर्फ छोटू विठ्ठल खंडारे याला जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला न्यायालयाने दि. 23.04.2026 रोजी जामीन अर्ज मंजुर केला. ॲड. पप्पू श्रीराम मोरवाल यांना सदरहु प्रकरणात ॲड. प्रविण तायडे, ॲड. सुनिल सरदार, ॲड. गणेश खेळकर, ॲड. सुनिल दिवनाळे, सौरभ डाहाके, प्रणव वानखडे, श्रवण राठोड इत्यादी यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या