ram-navmi-utsav-akola-city-: लाखो राम भक्तांच्या साक्षीने अकोला शहरात आज निघणार भव्य रामनवमी शोभायात्रा



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: महानगरातील माजी आमदार स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांच्या संकल्पनेनुसार सेवारत विश्व हिंदू परिषद-श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीने श्रीराम नवमी निम्मित शहरातून भव्य शोभायात्रा निघते. आज सायंकाळी ५ वाजता अकोला शहराचे आरध्य दैवत श्री राजेश्वर मंदिर येथून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. शोभायात्रेत विविध मंडळाचे धार्मिक सामाजिक देखावे राहणार आहे. लाखो राम भक्तांच्या साक्षीने हा अभूतपूर्व सोहळा पार पडणार आहे.


समितीच्या वतीने राम नवमी उत्सवाचा प्रारंभ हिंदू नववर्ष गुढी पाडव्याच्या पावन पर्वावर सुरू करण्यात आला. शोभायात्रेचे उत्सवाची सांगता होणार आहे.  उत्सवाचे आकर्षण म्हणजे यावर्षी आयोजकांनी भाविकांना लक्ष्मी नारायण च्या मूर्तींचे वाटप केले.  

रामनवमी पर्वात समितीच्या वतीने दरवर्षी कोतवाली चौकात आयोजित होत असणाऱ्या झाकीत यावर्षी पंचवीस फुटी भगवान नरसिह व हिरण्यकश्यप वध झाकी तयार केली आहे. ही 25 फुट उंच नरसिंह व हिरण्यकश्यपची विशाल झाकी बघण्यासाठी लाखो रामभक्त कोतवाली चौकात गर्दी करीत आहेत.  हा विहंगम देखावा बघण्याची पर्वणी विहीप- रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आला आहे.  


आजच्या शोभायात्रेत राम भक्तांनी  मोठ्या संख्येने सहभागी होवून रामनवमी महोत्सव भक्तीभावात साजरा करण्याचे आवाहन  रामनवमी शोभायात्रा समितीचे स्थायी अध्यक्ष कृष्णा गोवर्धन शर्मा, अध्यक्ष अरुण शर्मा, विहिप महानगर अध्यक्ष राजू मंजुळकर, कोषाध्यक्ष राहुल राठी, गणेश काळकर, सुरज भगेवार, गोपाल महाराज राजवैद्य, संजय दुबे, हरिओम पांडे, अँड श्याम वक्टे, निलेश पाठक ,मनमोहन दुबे, राहुल कानडे, प्रसाद देशपांडे, प्रकाश घोगलिया, संदिप वाणी , बाळ बिडवई, मनीष बाछुका, नितीन जोशी, अजय शर्मा, प्रशांत अवचार, सतीश ढगे, सुमित शर्मा, प्रियेश शर्मा, कल्पेश खंडेलवाल, जुगल खंडेलवाल, मंगेश गीते, कमल तिवारी,  संजय अग्रवाल, कपिल गुप्ता, सनी चावला, अश्विन शर्मा, हर्षद चाल्स, डॉ विजय शर्मा, अक्ष पटेल, संजय शर्मा, विक्की तिवारी, पवन शर्मा, नवनीत काछवाल, राहुल शर्मा, एड,सौरभ शर्मा,एड, गिरिराज शर्मा, अनिल शर्मा, डॉ विजय शर्मा, सिद्धार्थ शर्मा, धीरज खंडेलवाल, विलास अनासाने, नवीन गुप्ता, अर्चना शर्मा, पुष्पा वानखडे, चंदा शर्मा, सिमरन अम्मा, रेखा नालट, सरला देशमुख, कल्पना अडचुले, दिपाली वराडे, संगीता मानकर, प्रीती बुरकुटे, मनीषा देशपांडे, मीरा वानखडे, संतोषी शर्मा, मुक्ता पापडे, चित्रा फाफट, वैशाली शेगोकार, मुक्ता पुरी, सुनंदा गावंडे, अनिता डोंगरे, चित्रा खेलपांडे, आशा वळस्कर, दिपाली शिंदे, मालती रणपिसे, सुरेखा नबापुरे, गंगाबाई नबापुरे  समवेत विहिप-रामनवमी शोभायात्रा समितीचे बहुसंख्य सेवाधारी यांनी केले आहे.

                  


टिप्पण्या