ram-navami-festival-security-: रामनवमी उत्सवासाठी अकोला पोलीस सज्ज; ड्रोन, सीसीटीव्ही आणि विशेष बंदोबस्तासह सुरक्षा कडक
62 मिरवणुक: 1000 पेक्षा अधिक जवान तैनात
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला जिल्ह्यात रामनवमी उत्सवानिमित्त विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात मिरवणुक काढण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने व्यापक आणि कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. २५ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, जिल्ह्यात एकूण 62 मिरवणुक निघणार असून, त्यापैकी अकोला शहरात श्री राम नवमी शोभायात्रा समिती आयोजित भव्य मुख्य मिरवणूक सह २५ मिरवणुक काढल्या जाणार आहेत.
अकोला शहरासह अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर,हीवरखेड आदी भागात मोठ्या प्रमाणात मिरवणुक होणार असून, सुमारे १००० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
रामनवमी निमित्त मोटार सायकल रॅली, तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत.
ठळक मुद्दे
जिल्ह्यात एकूण 62 मिरवणुक; अकोला शहरात २५
1000+ पोलीस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात
SRPF, RCP पथक, स्ट्रायकिंग फोर्स यांची नियुक्ती
ड्रोन, सीसीटीव्ही आणि व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे देखरेख
संवेदनशील भागांत विशेष लक्ष व वॉच टॉवर्स
वाहतूक नियंत्रणासाठी डायव्हर्जन व विशेष योजना
महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके तैनात
गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई; काहींना जिल्हाबाहेर पाठवले
नागरिकांसाठी आपत्कालीन मदतीसाठी 112 हेल्पलाईन
पोलिसांचे आवाहन
पोलिस प्रशासनाने नागरिकांना शांतता, सामाजिक ऐक्य आणि धार्मिक सौहार्द राखण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अफवा किंवा भडकाऊ कृतींपासून दूर राहावे आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
माना पोलीस स्टेशनतर्फे ग्राम कुरुम येथे रूट मार्च
माना : आगामी श्री रामनवमी, महावीर जयंती व हनुमान जयंती या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी माना पोलीस स्टेशन चे ठाणेदार गणेश नावकार यांचे मार्गदर्शनाखाली ग्राम कुरुम येथे बुधवार, दि. 25 मार्च 2026 रोजी सायं. 5:50 ते 6:30 या वेळेत रूट मार्च काढण्यात आला.
या रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशन माना येथील 3 अधिकारी, 15 पोलीस अंमलदार तसेच 18 होमगार्ड यांनी सहभाग घेतला. ग्रामस्थांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे व शांतता राखण्याचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आगामी सण शांततेत व उत्साहात साजरे करण्याचे आवाहन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा