भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्हा व सत्र न्यायाधीश-१, ए. डी. क्षीरसागर यांनी आज दिनांक १७.०२.२०२६ रोजी आरोपी संजय हरिभाऊ बागळे, (वय ३४ वर्ष, व्यवसाय - मजुरी, रा. बोरगांव मंजु ता. जि. अकोला) यास फिर्यादी पुरुषोत्तम जानुजी आठवले यांना शिवीगाळ करुन गळ्यावर व तोंडावर चाकुने मारल्या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३२४ अंतर्गत २ वर्ष, ८ महिने व १४ दिवस कारावास व रु. ५००/- दंड व दंड न भरल्यास ७ दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
थोडक्यात हकीकत अशी पोलीस स्टेशन बोरगांव मंजु, ता. जि. अकोला येथे दिनांक ०२.०३.२००० रोजी आरोपीने फिर्यादी पुरुषोत्तम जानुजी आठवले यांना शिवीगाळ करुन गळ्यावर व तोंडावर चाकुने मारहाण केली अशा रिपोर्ट वरुन आरोपी विरुध्द गुन्हा कलम ३२४, ५०४ भा.दं. वि. दाखल केला व पुढील तपासामध्ये वैद्यकीय अहवाला वरुन कलम ३०७ अंतर्गत दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले.
सुरुवातीला तत्कालिन तपास अधिकारी, गणेश निमकर्डे पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी तपास केला व कलम ३०७ भा.दं.वि. वाढल्यानंतर सदर गुन्ह्याचा पुढील तपास संतोष यादवराव आघाव पोलीस उपनिरिक्षक यांनी करुन आरोपी विरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट केले.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण ०२ साक्षीदाराच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सदर प्रकरणामध्ये फिर्यादी (जखमी) याची साक्ष व तपासी अधिका-याची साक्ष ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा दिली. अतिरिक्त सरकारी वकील राजेश आकोटकर यांनी सरकार पक्षाची बाजु न्यायालयात मांडली. तसेच पैरवी अधिकारी ए. एस. आय. फझलुर रेहमान काजीं व हेड कॉन्स्टेबल नेहा चव्हाण व रुपेश इंगळे यांनी सहकार्य केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा