- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
bail-granted-akola-court-news: महिंद्रा गद्रे शोरूम अपहार प्रकरण: लाखो रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपात अटक असलेल्या आरोपींना नियमित जामीन मंजूर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: बहुचर्चित चार चाकी वाहनांचे महिंद्रा गद्रे शोरूम येथे आर्थिक अपहार प्रकरणात लाखो रुपयांच्या घोटाळ्यात अटक असलेल्या आरोपींना पाच दिवसात न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे.
शिवनी येथे ऑटोमोबाईल डीलरशिप गद्रे ऑटोकॉन प्रा.लि. चार चाकी वाहनांचे शोरूम असून, वाशीम शाखेत कार्यरत असलेले कर्मचारी मॅनेजर सह पाच आरोपींवर शोरूमच्या संचालिका प्राची अमोल गद्रे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले होते. 4 फेब्रुवारी रोजी एम.आय. डी. सी. पोलीस स्टेशन अकोला येथे महिंद्रा शोरूम मधील कर्मचाऱ्यांनी 5 लाख 29 हजार 899 रुपयांचा अपहार झाला असल्याचे तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 316 (4), 318(4), 3 (5) अन्वये संगनमताने अपहार केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
आरोपी ब्रँच मॅनेजर पंकज सरदार, अतुल अवचार, राहुल लांडगे, पियुष चौधरी यांच्या बाजूने विद्यमान 5 वे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अकोला यांच्या न्यायालयात प्रभावी कायदेशीर युक्तिवाद ॲड. आकाश गुलाबराव हिवराळे, ॲड.विशाल धुंदले, ॲड.शुभम करडीले, ॲड.गगन वाकोडे यांनी केला. सदर आरोप हे राजीनामा दिल्याच्या कारणावरून मनात राग धरून लावण्यात आले असून आरोपींताना अडकवण्यात आले आहे व इतरही कायदेशीर बाजुंना आरोपींच्या वकिलांनी प्रभावी मांडली. 5 वे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अकोला यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्ष यांची बाजू ऐकल्यावर बचाव पक्षाची बाजू ग्राह्य धरत आरोपी क्रमांक 1 ते 4 यांना अटक केल्यापासून पाच दिवसात नियमित जामीन मंजूर केला असून यांना जामीन मिळालेला आहे.
न्यायालयात ॲड. आकाश हिवराळे, ॲड. विशाल धुंदले, ॲड. शुभम करडीले, ॲड. गगन वाकोडे यांनी बचाव पक्षातर्फे युक्तिवाद केला असून, त्यांना ॲड. अजय भारसाकळे, ॲड. अमित वाहूरवाघ, ॲड. महिंद्रा सोळंके, आदित्य अवचार व अमन घरडे आदींनी सहकार्य केले.
extortion case
four wheeler showroom
fraud case
Gadre showroom
granted
Mahindra showroom
Regular bail
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा