भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: लॉर्ड बुद्धा फाउंडेशन वंदना संघ यांच्या वतीने गेल्या सन 2008 पासुन अकोल्यात स्थानिक अशोक वाटीका परिसरात 45 फूट उंचीचा विजयस्तंभ निर्माण करून दरवर्षी 1 जानेवारीला सकाळी मानवंदना दिली जाते. तसेच समाज प्रबोधनचे कार्यक्रम केले जातात. यावर्षीही कोरेगाव भीमा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
1 जानेवारीच्या सकाळी लॉर्ड बुद्धा फौडेशन वंदना संघ यांच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी, महार रेजिमेंटच्या सेवानिवृत्त सैनिकांकडून लष्करी शिस्तीतआणि एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी आणि भीमसैनिकांनी राष्ट्रगीतासह मानवंदना दिली. त्यानंतर समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष इरभान तायडे हे होते. स्वागताध्यक्ष दिवाकर गवई आणि कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणून किरण चक्रनारायण होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणून सुमन तिरपूडे, अविका जामनिक होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सीमा तायडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड दंदी यांनी केले व सूत्र संचालन महादेव तायडे यांनी तर आभार प्रदर्शन मंदा तेलगोटे यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १ जानेवारी १९२७ रोजी विजयस्तंभाला भेट दिली होती. या भेटीला १०० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे यंदाचे वर्ष 'मानवंदना शताब्दी वर्ष' म्हणून साजरे केले आहे. महार रेजिमेंटच्या निवृत्त सैनिकांकडून लष्करी शिस्तीत एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीतासह मानवंदना दिली.
१ जानेवारी १८१८ रोजी भीमा नदीच्या काठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशवा यांच्या सैन्यामध्ये ही ऐतिहासिक लढाई झाली होती. ब्रिटिश सैन्यामध्ये प्रामुख्याने महार समाजाचे सैनिक होते. पेशव्यांच्या मोठ्या सैन्याविरुद्ध या ५०० सैनिकांनी शौर्य दाखवून विजय मिळवला होता. पेशवाईच्या काळात अस्पृश्य समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्धचा हा स्वाभिमान आणि संघर्षाचा विजय मानला जातो. लढाईत वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ इंग्रजांनी हा विजयस्तंभ (जयस्तंभ) उभारला.
१ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभाला भेट देऊन हुतात्मा सैनिकांना मानवंदना दिली आणि या लढाईच्या इतिहासाला व सामाजिक चळवळीचे स्वरूप दिले. त्याचं अनुषंगाने आज विविध कार्यक्रम संपन्न झाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा