- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
hidayat-patel-murder-case-: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांचा उपचार दरम्यान मृत्यू; सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची समर्थकांची मागणी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
अकोट तालुक्यातील मोहाळा गावात मंगळवारी धारदार शस्त्राने हिदायत पटेल यांच्यावर हल्ला; आज बुधवारी पहाटे उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला | नीलिमा शिंगणे जगड
अकोल्यात मंगळवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ व वजनदार नेते हिदायत पटेल यांच्यावर अकोट तालुक्यातील मोहाळा गावात धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात हिदायत पटेल गंभीर जखमी होते. त्यांच्यावर अकोट येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर उपचारार्थ अकोला शहरात आणले होते. मात्र आज पहाटे ओझोन हॉस्पिटल अकोला येथे उपचारादरम्यान हिदायत पटेल यांचा मृत्यू झाल्याची माहिती मुलगा फतेह पटेल यांनी दिली.
काल हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत हिदायत पटेल यांना प्रथम अकोटमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोल्यातील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र यानंतर आज पहाटे त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली.
हल्ल्याची माहिती मिळताच अकोला व अकोटमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. परिस्थिती चिघळू नये, यासाठी अकोला शहरासह मोहाळा गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज अकोला शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा असल्याने हा बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना केली होती. अवघ्या काही तासातच पोलीसांनी मुख्य आरोपीस पणज गावातून ताब्यात घेतले. सर्व आरोपीस अटक करण्यात यावी, अशी मागणी पटेल यांच्या समर्थकांनी पोलिसांकडे केली. दरम्यान पोलीस स्टेशन आणि रुग्णालय परिसरात पटेल यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
हिदायत पटेल हे अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते होते. त्यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
akola
akot
breaking news
Congress
Crime news
Hidayat Patel
maharashtra
Mohalgaon
municipal elections
Political Attack
Politics
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा