ठळक घडामोड
तेल्हारा, आकोट, मुर्तीजापूरसह हिवरखेडवर भाजपची सत्ता कायम; बार्शीटाकळीत वंचित, बाळापूरमध्ये काँग्रेसचा गड अबाधित
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोला जिल्ह्यातील पाच नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीसाठी रविवारी (दि. २१) पार पडलेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत कामगिरी करत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
या निवडणुकीत चार नगरपरिषदांवर भाजपाच्या उमेदवारांनी नगराध्यक्षपद पटकावले, तर बार्शीटाकळी नगरपंचायतीत वंचित बहुजन आघाडी आणि बाळापूर नगरपरिषदेत काँग्रेसने आपला गड कायम ठेवला.
निवडणुकीचा थोडक्यात आढावा
एकूण नगराध्यक्ष पदे : ६
नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार : ३८
नगरसेवकांच्या जागा : १४२
नगरसेवक पदासाठी उमेदवार : ६७५
या निकालात भाजपाची स्पष्ट सरशी दिसून आली. तेल्हारा, आकोट आणि मुर्तीजापूर हे आधीचे गड भाजपने कायम राखले असून, नवीनच स्थापन झालेल्या हिवरखेड नगरपरिषदेतही भाजपने सत्ता मिळवली.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांची हिवरखेड येथे झालेली सभा निर्णायक ठरल्याचे या विजयातून स्पष्ट झाले आहे.
नगराध्यक्ष पदाचे निकाल
तेल्हारा – वैशाली पालिवाल (भाजपा)
आकोट – माया धुळे (भाजपा)
हिवरखेड – सुलभा दुतोंडे (भाजपा)
मुर्तीजापूर – हर्षल साबळे (भाजपा)
बार्शीटाकळी नगरपंचायत – अख्तरा खातून अलीमोद्दीन (वंचित बहुजन आघाडी)
बाळापूर – डॉ. अफरिन परवीन (काँग्रेस)
ठळक मुद्दे
अकोला जिल्ह्यात भाजपचा दबदबा कायम
हिवरखेड नगरपरिषदेत पहिल्यांदाच भाजपची सत्ता
वंचित बहुजन आघाडीचा बार्शीटाकळीत विजय
बाळापूरमध्ये काँग्रेसचा गड अबाधित
मुख्यमंत्र्यांच्या सभेचा थेट निवडणूक निकालावर प्रभाव
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय
भाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे आभार
विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला दणदणीत यश देऊन मतदारांनी विकास, सेवा, सुशासनला कौल दिला आहे. 125 पेक्षा अधिक जागांवर भाजपाचा विजय आणि 1100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून दिले आहेत. जिल्ह्यात 55 तर नगराध्यक्ष चार ठिकाणी भाजपाचे विजयी झाले हा भाजपावर मोठा विश्वास दाखविल्याबद्दल जनतेचे आभार मानतो असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि अकोला जिल्हा प्रभारी आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
भाजपा जिल्हा कार्यालयासमोर लोकनायक जयप्रकाश नारायण चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृहस मोर झालेल्या विजयोत्सवावेळी ते बोलत होते. ढोलताशांचा गजर करत ,गुलाल उधळत, मिठाई वाटप करीत भाजपाचा विजय साजरा करण्यात आला.
यावेळी खासदार अनुप धोत्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, महानगराध्यक्ष जयंत ,मसणे, विजय अग्रवाल डॉक्टर अमित कावरे, वैशाली शेळके, माधव मानकर, संजय गोटफोडे, अंबादास उमाळे, एडवोकेट देवाशिष काकड, आम्रपाली , उपरवट , राजेश नागमते, गोपाल मोहोड , प्रवीण हगवणे तुषार भिरड, गोपाल मुळे नितेश पाली नितीन राऊत, अमोल गीते, किशोर कुचके गणेश लोड नितीन लांडे, एडवोकेट रूपाली काकडे, सिद्धार्थ शर्मा डॉक्टर किशोर मालोकार कृष्णा चव्हाण परीमल कांबळे,, पवन पाडीया रमेश अल्करी, संदीप गावंडे, यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
भाजपा कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून या निवडणुकीत मेहनत घेतली असून हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित करतो, असेही आमदार सावरकर यांनी नमूद केले.
यावेळी खासदार अनुप धोत्रे म्हणाले की, आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणांवर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख कामकाजावर जनतेने व्यक्त केलेल्या विश्वासामुळे हा विजय सत्यात उतरला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, कार्यकारी अध्यक्ष नितीन नबिन, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष, सह संघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, अरुण सिंग, जिल्ह्यात पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश कुंडकर भाजपा निवडणूक प्रभारी आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे, यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीने लढली. या विजयाचे सर्व श्रेय हे , कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते आणि अर्थातच मतदारांचे आहे. या विजयाचा सन्मान राखत जिल्ह्यातील जनतेने भाजपावर ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही कटीबद्ध आहोत तसेच तसेच आमदार भावना गवळी माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वात रिसोड मालेगाव रिसोड मालेगाव रिसोड मालेगाव येथे विजय प्राप्त झाला. नागरिकांच्या समस्या दूर करून आगामी महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला प्रचंड यश मिळेल जनतेचा आशीर्वाद प्राप्त अशी ग्वाही खासदार अनुप धोत्रे यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस हे एकमेव नेतृत्व राज्याला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाण्यास समर्थ आहे. मराठवाडा ग्रीड मुळे अनेक ठिकाणी पाणी पोचले, विदर्भाचा अनुशेष भरून काढला जात आहे, कोकणाचा समृद्ध विकास होत आहे. अशा रितीने प्रत्येक विभागाचा विकास केला म्हणून जनतेने भाजपा महायुतीला कौल दिला असेही खासदार धोत्रे यांनी नमूद केले.
विरोधकांचा समाचार घेत विजय अग्रवाल म्हणाले की, विरोधकांनी हीन टीका केली, फेक नरेटिव्ह पसरवले तरीही मतदारांनी भाजपावर विश्वास टाकला. उद्धव ठाकरे म्हणाले होते राज्याच्या जनतेला देण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही म्हणून उबाठा गटाची लायकी जनतेने ओळखत त्यांना काहीच दिले नाही, उबाठा गट दोन आकडी मजल देखील मारू शकला नाही असा टोला अग्रवाल यांनी लगावला.
यापुढेही आगामी निवडणकांमध्ये जनता भूलथापांना बळी पडणार नाही आणि अकोलेकर तर नाहीच नाही असे त्यांनी स्पष्ट केले. स्वप्नातील महाराष्ट्र अकोला घडवण्यासाठी जनता भाजपा सोबत राहील असा विश्वासही श्री. जयंत मसणे यांनी व्यक्त केला.
कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचंड मेहनत
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका ह्या सामान्य कार्यकर्त्यांच्या असतात. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी मेहनत घेतली. राज्यात 50 हून अधिक ठिकाणी श्री. फडणवीस यांनी सभा घेतल्या. ज्या ठिकाणी जाणे शक्य नव्हते तेथे दूरध्वनीवरून,ऑनलाइन पद्धतीने मतदारांशी संपर्क साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहोरात्र घेतलेली मेहनत आणि राज्याचा केलेला विकास यामुळे तसेच आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे खासदार अनुप धोत्रे निवडणूक प्रभारी आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल, संतोष शिवरकर जयंत ,मसणे विजय अग्रवाल विजय अग्रवाल डॉक्टर अमित कावरे, तसेच महिला आघाडी विविध आघाडी यांनी केलेली मेहनत हा विजय प्राप्त झाल्याचे श्री. संतोष शिवरकर म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्याला सलाम करत राज्याच्या कानाकोप-यातील समस्यांची जाण देवेंद्रजींना आहे आणि त्यावर मात करण्याचे कसबही आहे म्हणून हा विजय मिळाला आहे.
महापालिका निवडणुकीतही विकासाच्या मुद्यावर भाजपाला मोठे यश मिळेल
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला कौल दिला आहे. राज्यात पायाभूत सुविधा विकासाची मोठी कामे महानगरांमध्ये सुरु आहेत. याच कामांच्या आधारावर महापालिका निवडणुकीतही मतदार विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला विजयी करतील, असा विश्वासही खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा