ठळक मुद्दा
राऊत यांच्या वक्तव्याला भाजप खासदार व विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचे ठाम प्रतिउत्तर; सामना राजकीय नजरेतून नव्हे तर खेळाडू वृत्तीने बघावा, असा दिला सल्ला
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांवरून पुन्हा एकदा राजकीय तापमान चढलं आहे. शिवसेना (यूबीटी) चे खासदार संजय राऊत यांनी सामना खेळण्यावरून भाजपवर टीका करत “भाजपला रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं?” असा थेट सवाल केला.
यावर प्रत्युत्तर देताना भाजप खासदार व विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी ठाम भूमिका मांडली.
निकम म्हणाले,
“आम्ही पाकिस्तानसोबतचं शत्रुत्व कायम ठेवणार आहोत. त्यांच्या कुरापती कधीच विसरणार नाही. मात्र मैदानात आम्ही चांगले खेळाडू म्हणून वागत आहोत. पाकिस्तानच्या प्रत्येक कुरापटीला भारताने उत्तर दिलं आहे.”
ते पुढे म्हणाले की, “लोकांना क्रिकेट आवडतं. पाकिस्तानला मैदानात हरवण्याचा जो आनंद आहे, तो काही वेगळाच असतो. त्यामुळे या स्पर्धेकडे राजकीय दृष्टीने नव्हे तर खेळाडू वृत्तीने पाहणं आवश्यक आहे.”
“शत्रुत्व कायम, पण मैदानात आम्ही खेळाडू. पाकिस्तानला हरवण्याचा आनंद वेगळाच.”
- उज्वल निकम,
खासदार व विशेष सरकारी वकील
संजय राऊत यांचा प्रश्न : “रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं?”
उज्वल निकम यांचं प्रत्युत्तर : “शत्रुत्व कायम, पण मैदानावर खेळाडूपण.”
सामना राजकीय नव्हे तर क्रीडावृत्तीने अनुभवावा, असा सल्ला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा