shiv-sena-bjp-mla-clash-akola: अकोला जिल्हा नियोजन समिती सभेत शिवसेना आणि भाजपा आमदारात जुंपली; सभागृहात आमदारांमध्ये भांडण बाहेर कार्यकर्ते भिडले




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची सभा आज गुरुवारी आयोजित केली होती. 



सभेत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आमदार नितीन देशमुख आणि भाजपा आमदार रणधीर सावरकर यांच्यात दलीत वस्ती मुद्यावरून जुंपली. 




विशेष म्हणजे पालकमंत्री ॲड आकाश फुंडकर यांच्यासमोरच हा राडा झाल्याने आजची सभा राज्यभर गाजत आहे.




भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख या सभेत अक्षरशः एकमेकांवर धावून गेलेत. 




दलित वस्तीच्या मुद्द्यावरुन दोन्ही आमदारांमध्ये भांडण झालं. दोघांकडूनही एकमेकांना शिवीगाळ देखील करण्यात आली.




पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत आज अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होती. भर बैठकीत दोन्ही आमदारांनी एकमेकांना अश्लील शिवीगाळ केली.



 यावेळी उपस्थित अधिकारी मंत्री आणि आमदारांनी सावरकर आणि देशमुख यांना आवरल्यामुळे हाणामारीचा प्रसंग टळला. यावेळी दोन्ही आमदार ऐकमेकांवर धावून गेल्याचं उपस्थितांना पाहायला मिळाले. 




सभागृहात आमदार सावरकर आणि आमदार देशमुख यांच्यात राडा झाल्याचे कळताच बाहेर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकावर भिडले. 





जिल्हाधिकारी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करीत तापलेले वातावरण शांत केले. 


टिप्पण्या