- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
NEET-exam-aakash-coaching: नीट परीक्षेत अकोल्याच्या अर्जुन ठाकरेची बाजी; ऑल इंडिया रँकिंग 1142 मिळवून जिल्ह्यात प्रथम
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : येथील अर्जुन ठाकरे याने नीट यूजी २०२५ परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँकिंग ११४२ मिळवून शहरातील टॉपर होण्याचा मान पटकावला आहे. याबाबतची घोषणा आकाश एज्युकेशन संस्थेने आज केली. ही उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थ्याच्या कठोर परिश्रम, शैक्षणिक शिस्त आणि संस्थेकडून मिळालेल्या जागतिक दर्जाच्या मार्गदर्शनाचे फलित आहे असे मत अर्जुन ठाकरे यांनी व्यक्त केले.
याबाबत बोलताना अर्जुन ठाकरे म्हणाला की, : “या प्रवासात मला सातत्याने योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल मी आकाश एजुकेशनल सर्विसेज लिमिटेडचा मनःपूर्वक आभारी आहे. संरचित अभ्यासक्रम, तज्ज्ञ शिक्षकांची शिकवणी आणि वैयक्तिक मार्गदर्शन यामुळे मी कठीण विषयांवर सहज प्रभुत्व मिळवू शकलो.”
डॉ. एच. आर. राव, आकाशचे मुख्य शैक्षणिक व व्यवसाय प्रमुख, यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले: “नीट यूजी २०२५ मध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेली कामगिरी अत्यंत अभिमानास्पद आहे. देशभरातून २३ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होतात, अशा परिस्थितीत इतके चांगले गुण मिळवणे ही एक मोठी उपलब्धी आहे. हे यश केवळ विद्यार्थ्यांच्या मेहनतीचेच नाही, तर त्यांच्या पालकांच्या पाठबळाचे आणि आमच्या शैक्षणिक टीमच्या अथक प्रयत्नांचेही प्रतिक आहे." असे सांगत त्यांनी अर्जुनच्या वैद्यकीय कारकिर्दीसाठी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.”
निकाल काल नॅशनल टेस्टिंग एजन्सी ने अधिकृतपणे जाहीर केला. अर्जुन याने त्याच्या यशाचं श्रेय संस्थेने ने दिलेल्या मजबूत शैक्षणिक पाया, संकल्पनांची स्पष्टता आणि सातत्यपूर्ण व शिस्तबद्ध अभ्यासपद्धतीला दिलं आहे.
NEET UG ही परीक्षा दरवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे घेतली जाते. भारतातील सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये MBBS, BDS आणि आयुष (BAMS, BUMS, BHMS इ.) पदवी अभ्यासक्रमांसाठी तसेच विदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही पात्रता परीक्षा अनिवार्य आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा