- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ncp-civilized-politics-ajit-pawar: सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढं नेण्याचे काम राष्ट्रवादी करताहे - अजित पवार यांचे वक्तव्य
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महाराष्ट्रातील वीर पराक्रमी, महामानव आणि थोर विचारवंतांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढं नेण्याचे काम राष्ट्रवादी करीत आहे. आणि पुढंही करीत राहील, अशी शाश्वती देत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सर्वांना कसा न्याय देता येईल, याचा पक्षात विचार केला जातो.
जुन्या नव्याचा भेद न करता सर्वांना सोबत घेऊन जायचं, असा गुरू मंत्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 व्या वर्धापन दिनानिमित्त अकोल्यात गुरुवारी पोलीस लॉन येथे कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश सोहळा आयोजित केला होता. यावेळी ना. पवार बोलत होते.
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान अपघात झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुखरुपतेसाठी एक मिनिटाचं मौन बाळगून, प्रार्थना करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी महापौर मदन भरगड यांच्यासह अन्य शेकडो प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्व मान्यवरांचं अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
मदन भरगड या नेत्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशामुळे अकोला महानगरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद खूप मोठ्या प्रमाणात वाढणार असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये याचा पक्षाला भरपूर फायदा होईल असे देखील अजित पवार म्हणाले.
‘आगीतून निघालो अन् फुफाट्यात पडलो' अशी वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांवर येऊ देणार नाही, असा शब्द अजित पवार यांनी इतर पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेल्यांना दिला.
अमोल मिटकरी यांना पक्षाने आमदारकीची संधी दिली आहे. त्यांनी चांगले काम करून बेरजेचे राजकारण करावे, असे सूचक वक्तव्य पवार यांनी यावेळी केले.
सभा स्थळी पाऊस येण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने अजित पवार यांनी कुठलाहीअनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यकर्त्यांची माफी मागून आपल्या घरी सुरक्षित जा. असे सांगून भाषण आटोपते घेतले.
याप्रसंगी राज्याचे मंत्री इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमरावती विभागीय समन्वयक तथा आमदार संजय खोडके, आमदार अमोल मिटकरी, युवक राष्ट्रवादी अध्यक्ष सूरज चव्हाण, आमदार मनोज कायंदे, आमदार किरण सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रूजमा, शहर अध्यक्ष विजय देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अमोल कालने, महिला जिल्हाध्यक्ष रूपाली वाकोडे, राष्ट्रवादीच्या नेत्या प्रतिभा अवचार, काशीराम साबले, अजबराव उईके, डॉ इंगोले, राधा बिडकर यांच्यासह पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रूजमा, यांनी केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने उतरणार असून, त्यादृष्टीने कामाला लागलो आहे. सर्व निवडणुकीत राष्ट्रवादीचा ध्वज फडकताना दिसेल, असा विश्वास मो. बद्रुजमा यांनी यावेळी व्यक्त केला.
माजी आमदार जिशान सिद्दीकी यांनी आपल्या मनोगतामध्ये लोकनेते स्व. बाबा सिद्दिकी यांचे कार्य अविरत राहणार असल्याची ग्वाही दिली. ना. अजित पवार यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थकी लावून राष्ट्रवादी पक्षामध्ये निष्ठेने काम करेल, अशी ग्वाही देऊन राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा आगामी निवडणुकीत फडकवून दाखवील, असा ठाम विश्वास माजी महापौर मदन भरगड यांनी व्यक्त केला. यावेळी भारगड यांनी त्यांचा राजकीय प्रवास कथन केला.
मागील दोन महिन्यापासून आम्ही एकदिलाने पक्ष बांधणीसाठी कामाला लागलो आहे. शहरात सर्वजण एकत्र येऊन मनपासाठी 'किंगमेकर' ठरू, असा विश्वास आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
सभा होताच पाऊस जोरदार बरसल्याने सभेला उपस्थित नागरिकांनी तारांबळ उडाली.
कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा ⬇️
NCP karykarta मेळावा आणि पक्ष प्रवेश सोहळा
Ajit Pawar
Akola
Amol Mitkari
civilized politics
Madan Bhargad
moh badruzzama
NCP
Political news
rashtrawadi congress
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा