devendra-fadnavis-akola-city: अकोल्यात नामदार फडणवीस यांची जंगी विकास संवाद सभा; स्वागतासाठी राज राजेश्वर नगरी सज्ज!

  संग्रहित छायाचित्र


ठळक मुद्दे


*दोन हजार कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लागले कामाला


*विविध विकास कामांचे लोकार्पण


*एसीसी मैदानावर होणार सभा



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: आरोग्य सेवा पासून तर शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली जमीन साठी धरणे रस्ते तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने सर्वसामान्य नागरिकांना बस सेवा आरोग्यसेवा मातृशक्तीसाठी महिला बाल विकास भवन, सर्वोपचार रुग्णालयात नवीन वाढ अकोला शहरात ऑलम्पिक दर्जाचे जलतरण तलाव बांधकाम अकोला शहरातील अद्यावत सांस्कृतिक भवन अकोला तालुका क्रीडा संकुलन संकुल क्रीडा क्षेत्रासाठी तसेच अकोला तहसील उपविभागीय कार्यालय नवीन इमारतीचे लोकार्पण कार्यक्रम तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील नवीन इमारत विविध कामे एसटीपी लेडीज हॉस्पिटल येथे पाण्याची समस्या निराकरणासाठी तसेच मुर्तीजापुर मतदार संघातील बार्शीटाकळी शहरातील मुख्य रस्त्याचे बांधकाम हिवरा कोरडे उपकेंद्र केवी पारस उपकेंद्र सौर ऊर्जा कृषी वाहणी लोकार्पण बार्शीटाकळी भेंडी महल तसेच पिंजर उपकेंद्र बार्शीटाकळीतील रेडवा सौर प्रकल्प , हायब्रीड अनुयुटी अंतर्गत अकोट मतदार संघातील राज्यमार्ग क्रमांक 47 रावेर पाचोरा पिंपळगाव खाडवी जळगाव जामोद हिवरखडे अकोट या मार्गातील रस्त्याची भूमिपूजन कार्यक्रम 3000 हजार कोटी भूमिपूजन ,कोनशीला, लोकार्पणसाठी राज्याचे महायुतीचे नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजेश्वर नगरीमध्ये 11 जून बुधवार रोजी दुपारी एक वाजता येत असून या निमित्ताने स्थानिक क्रिकेट क्लब येथे विकास संवाद सभेचे आयोजन केले आहे. या सभेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर पालकमंत्री नामदार आकाश भाऊसाहेब फुंडकर, खासदार अनुप धोत्रे आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, आमदार वसंत खंडेलवाल जिल्हा अध्यक्ष संतोष शिवरकर जयंत मसने विजय अग्रवाल किशोर पाटील यांनी केली आहे. 



अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील विविध कामासाठी लोकार्पण आणि कोनशीला लोकार्पण भूमिपूजन 2403.87कोटीची कामे तर अकोट विधानसभा मतदारसंघातील 290 कोटी, 88 कोटी रुपयाचे विकास कामे मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघातील आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे यांच्या मतदारसंघातील कामांच्या विकास परवाला गती देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री येत असून यामध्ये अकोला तहसील उपविभागीय कार्यालयाचे लोकार्पण अकोला तालुका क्रीडा संकुल बांधकामचे कोनशीला अकोला शहरातील अद्यावत सांस्कृतिक भवन कोनशीला अकोला शहरातील ऑलिंपिक दर्जाची जलतरण दर्जाचे बांधकामाची कोनशिळा समारंभ अकोला येथील सर्वोच्च रुग्णातील नवीन इमारतीच्या बांधकामाची भूमिपूजन अकोला येथील महिला बालविकास भवन इमारतीचे बांधकाम पूर्णा नदीवरील काठीपाठी मॅरेज प्रकल्पाची भूमिपूजन नवीन पशुवैद्यकीय पदवी विज्ञान महाविद्यालय इमारतीचं बांधकामाचे भूमिपूजन अकोला महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र सरकार प्रस्तुत अमृत योजनेचा मल निसारण टप्पा क्रमांक एकचे बांधकाम ची भूमिपूजन राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत पंतप्रधान जन विकास कार्यक्रम अंतर्गत शिवापुर येथे जिल्हा रुग्णालयाचे कोणशीला अकोला महानगरपालिका क्षेत्रांतर्गत प्रधानमंत्री व सेवा योजना अंतर्गत महानगरपालिकेच्या ई बस डेपो व चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्याचे कामाचे भूमिपूजन हायब्रीड युनिटी कार्यक्रमांतर्गत मूर्तिजापूर दहिगाव  उमरी अकोला राज्य महामार्गातील मार्गाची सुधारणा करण्याचे भूमिपूजन कार्यक्रम हायब्रीड युती कार्यक्रमांतर्गत उकळी बाजार निर्माण खेळ राज्य महामार्ग वरील किनखेड ते दहीहंडा महामार्गाची सुधारणा हायब्रीड युनिट अंतर्गत कार्यक्रमांतर्गत अकोला मलकापूर कान्चुरी मोरगाव काकडे बोरगाव खुर्द तसेच अकोला येथील पोलीस कर्मचारी करता दक्षता नगर येथे 246 निवासस्थाने परिसराचा विकास कामाचा कोनशीला, बार्शीटाकळी शहरातील मुख्य रस्त्याचे बांधकाम भूमिपूजन केवी हिवरा कोरडे उपकेंद्र टीव्ही पारद उपकेंद्र भेंडी मालगाव येथील सौर प्रकल्प बार्शीटाकळी रेल्वे गाव येथील सौर प्रकल्प यांचे लोक लोकार्पण कार्यक्रम होणार आहे. तसेच अकोट मतदार संघातील राज्य महामार्ग 47 रावेर पाचोडा पिंपळगाव खांडवी जळगाव जामोद हिवरखेड अकोट मार्गावरील रंभापुर ते हिवरखेड ते वरखेड या भागाचा भूमिपूजन 290 कोटी रुपयांचे कामाचं होणार आहे.

 या निमित्ताने विकास संवाद सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी तसेच कोण शीला आणि भूमिपूजन लोकार्पण सोहळा आहे. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन सभागृहात होणार आहे 


सर्व नागरिकांशी संवाद साधण्यासाठी विकास संवाद सभा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या सभेला अकोला जिल्ह्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून या दृष्टीने वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आले असून मातृ शक्ती , ज्येष्ठ नागरिक, व्यापारी डॉक्टर्स शिक्षक यांच्यासाठी वेगळे कक्ष तसेच कार्यकर्ता व समाजातील विविध घटकांसाठी बसण्याची व्यवस्था पस्तीस हजार पेक्षा जास्त खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास दोन हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आले असून, या समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवस्थेचा नियोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये अप्रिय घटना घडू नये या दृष्टीने सुद्धा दक्षता घेण्यासाठी दक्षता पथक सुद्धा नेमण्यात आले. आपल्या नेत्याच्या सुरक्षा आणि सभेमध्ये गडबड होऊ नये या दृष्टीने सुद्धा विशेष योजना करण्यात येणार असून भारतीय जनता पक्षाची जनता युवा मोर्चा महिला आघाडी यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. 



विविध सामाजिक संघटना यांनी येणाऱ्या नागरिकांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आरोग्यसेवा सुद्धा उपलब्ध राहणार आहे. हा भव्य दिव्य कार्यक्रम अकोल्याच्या इतिहासामध्ये विकास पर्व सोबत ऐतिहासिक सभा होणार असून या निमित्ताने समाजातील सर्व घटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑपरेशन शेंदूर नंतर अकोला शहरांमध्ये राष्ट्रचेतना तसेच राष्ट्रभक्त भक्तीचा प्रतीक म्हणून देवेंद्र फडणवीस येत असल्यामुळे पक्षाच्या 52 विविध आघाड्या कामाला लागले आहे. वाजत गाजत आदिवासी ओबीसी समाजातील विविध घटक आपल्या परंपरागत वेशभूषा सोबत आपल्या लाडक्या नेत्याचा स्वागतासाठी सज्ज झाले आहे. 

आतापर्यंत पक्षातील विविध लोकप्रतिनिधी यांनी छोट्याखानी 127 सभा घेऊन समाजातील सर्व घटकांना निमंत्रित केले असून यानिमित्ताने राज्य शासनाच्या महायुती सरकारने केलेले कामे केंद्र सरकारने केलेली कामे संकल्प सिद्धी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प तसेच भूमिपूजन आम्ही करणार आणि उद्घाटन आम्ही करणार हा देवेंद्र फडणविस यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी मोठ्या संख्येने अकोला जिल्ह्यातील व शहरातील समाजातील नागरिक जात-पात पंथ विसरून विकास परवाला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार ,अशी माहिती भाजप सूत्रांनी दिली आहे.



अकोल्याच्या इतिहासातील ही महत्त्वाची सभा यासाठी वेगवेगळे समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी या कार्यक्रमांमध्ये सक्रिय योगदान नेमले असून या दृष्टीने भाजपाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी स्वतः लोकप्रतिनिधी समजून निमंत्रण देत असून प्रत्येक नागरिकाशी संवाद साधून विकास संवाद सभेमध्ये येण्याची निमंत्रण देत आहे. ग्रामीण भागातून प्रत्येक बूथ निहाय नागरिक उपस्थित राहण्यासाठी कार्यकर्ते ग्रामीण भागात आणि शहरात जोमाने कामाला लागले आहे.

टिप्पण्या