- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
concluding-rss-shiksha-varga: विकसित राष्ट्रासाठी पंचसूत्रीचा संकल्प करा - रा.स्व.संघाचे संपर्क प्रमुख शैलेष पोतदार यांचे प्रतिपादन; संघ शिक्षा वर्गाचा समारोप
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: देशातील सध्याचा काळ हा अमृतवर्षाचा आहे. २०४७ साली आपण स्वातंत्र्याची शताद्बी साजरी करणार आहोत. तोपर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी सामाजिक समरसता,पर्यावरण, स्वबोध, स्वदेशी आणि कुटुंब प्रबोधन या पंचसूत्रीची कास धरा, समाजातील सज्जनशक्तीचे जागरण करा, असे आवाहन रा.स्व.संघाचे संपर्क प्रमुख शैलेष पोतदार यांनी केले. ते येथील एसीसी मैदानावर शनिवार, ३१ मे रोजी आयोजित संघ शिक्षा वर्गाच्या जाहीर समारोप प्रसंगी बोलत होते.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी ब्रिजमोहन चितलांगे, सर्वाधिकारी उल्हास बपोरीकर, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल उपस्थित होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की, समान संस्कृती, समान जीवनमूल्य ही आमची सनातन काळापासूनची परंपरा आहे. प्रभू श्रीराम आमच्या जीवनमूल्याचे तर महाकुंभासह आमच्या एकत्वाचे अनेकानेक प्रतीक आहेत. दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात हिंदू धर्मात भेद निर्माण करणार्या चुकीच्या बाबी समाविष्ट झाल्या असल्या तरी हे भेद, विषमता आपल्याला समरसतेच्या कृतीतून दूर करावे लागतील. गावागावातील पाणवठे, स्मशानभूमि, विहिरी, मंदिरे यात सर्वांना सन्मानाने प्रवेश दिला जावा व यासाठी सर्व घटकांना एकत्र आणण्याचे काम आपणास करावे लागणार आहे असे पोतदार यांनी सांगितले.
कथित विकसित पश्चिमी देशांनी निसर्गाचे शोषण करून पर्यावरणाचा भीषण प्रश्न निर्माण केला आहे.आमची भारतीय हिंदू संस्कृती मात्र निसर्गाचे शोषण नव्हे तर दोहन करावे असे शिकविते. वृक्षलागवड, पाण्याचे संवर्धन महत्वाचे आहेच पण सोबतच प्लॅस्टिक निर्मूलन ही चळवळ व्हावी आपणास पर्यावरण स्नेही बनावे लागेल.शिवाय स्वदेशी आचरण जीवनात आणावे लागेल.घरात विदेशी वस्तू आपण आणणार नाही असा संकल्प सर्व समाजाने करावा असे आवाहन त्यांनी केले.
भाषा आणि भूषा हे स्वदेशीच असावे असे म्हणत विदेशी आक्रमकांनी आपली कुटुंब व्यवस्था मोडण्यासाठी अनेक कपट केले. कुटुंब हे राष्ट्राचे शक्ती केंद्र आहे. कुटुंब व्यवस्था सुदृढ व्हावी यासाठी त्यांनी विविध उदाहरण दिले. या शिवाय नागरी कर्तव्याच्या भावनेत सजगता असली पाहिजे. असेही ते म्हणाले.
त्यांनी आपल्या या उद्बोधनात भारतातील महान व पराक्रमी अशा इतिहास पुरूषांची माहिती दिली. ते म्हणाले आक्र्रमणकारी मोगलांनी अनेक मंदिरे तोडली पण अहल्यादेवी होळकर या महापराक्रमी व साध्वी स्त्रीने स्वखर्चातून १०० पेक्षा अधिक मंदिरे बांधून त्यांचा जीर्णोद्धार केला आहे.या प्रसंगी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ,महाराणा प्रताप, शीख गुरू अर्जूनदेव यांच्या महानतेवरही प्रकाश टाकला.
ते म्हणाले अतिरेक्यांना पाठिंबा देणार्या पाकला भारतीय लष्कराने चांगलाच धडा शिकविला आहे. पण भारतातील काही घटक यावर संशय निर्माण करीत आहेत अशा घटकांना देशातील लोकांनी ओळखावे असेही ते म्हणाले.
यावेळी प्रमुख अतिथी ब्रिजमोहन चिंतलांगे यांचे उद्बोधन झाले. शिक्षार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिक सादर केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा