भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शेतीचे हद्दी खुणा कायम करून त्याबाबतचा आदेश देण्याकरीता पातुर तहसिलचे महसुल नायब तहसिलदार बळीराम चव्हाण हे रूपये चार हजार लाच रक्कमेची मागणी केल्या प्रकरणी एसीबी अँटी करप्शन ब्यूरो च्या जाळ्यात अडकले आहेत.
प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की, यातील तक्रारदार यानी ११ जून २०२५ रोजी अन्टी करप्शन ब्युरो, अकोला येथे तकार दिली की, त्यांचे शेतीचे हद्दी खुणा कायम करून त्याबाबतचा आदेश देण्याकरीता पातुर तहसिलचे महसुल नायब तहसिलदार बळीराम चव्हाण हे रू. ४,०००/- लाच रक्कमेची मागणी करीत आहेत.
या तक्रारीवरून १२ जून २०२५ रोजी तहसिल कार्यालय पातुर येथे पंचासमक्ष आजमाविण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान महसुल नायब तहसिलदार बळीराम चव्हाण यांनी तक्रारदारास रूपये ४ हजार लाच रक्कमेची मागणी केली. तसेच सदर वेळी त्यांचे कार्यालयात उपस्थित असलेले एका इसमाने तक्रारदारास लाच रक्कम देण्याकरीता प्रोत्साहीत केल्याचे निष्पन्न झाले.
१२ जून २०२५ रोजी तहसिल कार्यालय पातुर येथे शासकीय पचासमक्ष सापळा कार्यवाही आजमाविण्यात आली असता, सदर सापळा कारवाई दरम्यान बळीराम चव्हाण, महसुल नायब तहसिलदार यांनी तक्रारदाराकडुन लाच रक्कम घेण्यास टाळाटाळ केली.
आज रोजी तक्रारदार यांनी आरोपी बळीराम चव्हाण, महसुल नायब तहसिलदार यांना त्यांचेवर संशय आला असुन ते भविष्यात तक्रारदारास लाच रकमेची मागणी करणार नाहीत किंवा त्यांचे कडुन लाच रक्कम स्विकारणार नाहीत. दोन्ही आरोपीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याकरीता दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, १२ प्रमाणे पोलीस स्टेशन पातुर ता. पातुर, जि. अकोला येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई मारूती जगताप, पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती, सचिंद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक अ.क. ब्युरो अमरावती व मिलींदकुमार बहाकर पोलीस उपअधीक्षक अ. क. ब्युरो अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल इंगोले, प्रविण वेरूळकर, पोलीस अंमलदार प्रदीप गावंडे, संदीप नाले, डिगांबर जाधव, निलेश शेगोकार, श्रीकृष्ण पळसपगार, असलम व चालक सलीम खान, चालक नफीस खान यांनी केली आहे.
.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा