akola-crime-murder-yavatmal: कौलखेड चौकात यवतमाळ येथील व्यक्तीची हत्या; चार तासात प्रकरणाचा उलगडा, पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरातील कौलखेड चौकात शनिवारी मध्यरात्री झालेल्या थरारक हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली.  मृतक हा यवतमाळ येथील  मूळ रहिवासी असून, गंगाधर डाबेराव (वय 32) असे त्याचे नाव असल्याचे समोर आले आहे.



शनिवार 14 जूनच्या मध्यरात्री अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कौलखेड चौकात ही घटना घडली. 



प्राप्त माहिती नुसार शनिवारी रात्री 12:30 च्या सुमारास, दोन व्यक्ती नशेत धुंद अवस्थेत लाकडी दंडुका आणि दगडाने एकमेकांवर हल्ला चढवित होते. काही क्षणातच ही हाणामारी इतकी उग्र झाली की, यवतमाळ येथील रहिवासी गंगाधर डाबेराव (वय 32) याचा जागीच मृत्यू झाला. रविवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास स्थानिक नागरिकाने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली. 


माहिती मिळताच अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक शंकर शेळके व खदान पोलीस स्टेशनचे निरीक्षक मनोज केदारे ताफा सह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.



या प्रकरणाच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखा सक्रिय झाली आहे. प्राथमिक तपासानंतर एका संशयित इसमाला  ताब्यात घेवून त्याची कसून चौकशी सुरू केली.  घटनास्थळ जवळील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शीची माहिती आणि संशयिताचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासले गेले.


चार तासात प्रकरणाचा उलगडा; आरोपीच्या मुसक्या आवळल्या


पो स्टे खदान अकोला येथे फिर्यादी  उमेश दिनकर मस्के (वय 40 वर्ष रा. कौलखेड चौक अकोला) यांनी  15 जून रोजी फीर्याद दिली की, 15 जून 2025 रोजी सकाळी 6 वाजता नेहमी प्रमाणे मी माझे यश धाबाचे गेट उघडणे करीता गेट समोर गेलो असता, इसम गंगाधर डाबेराव (रा. यवतमाळ ह.मु. कौलखेड चौक, अकोला) हा मृत अवस्थेत पडलेला दिसला. त्यास कोणी तरी अज्ञात इसमाने त्याचे डोक्यावर दगड व काठी मारून त्याचा खुन केल्याचे दिसून आले. फिर्यादीचे अश्या जबानी रिपोर्ट वरून पो स्टे खदान अकोला येथे खुनाचा गुन्हा दाखल करून तपासावर घेण्यात आला.


सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे बाबत  पोलीस अधिक्षक यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला व त्यांचे पथकास आरोपीचा तात्काळ शोध घेण्या बाबत आदेशीत केले. त्यावरून पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी आरोपीचा शोध घेणे बाबत वेगवेगळे पथक तयार करून तपास कामी रवाना केले.


सदर पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा आरोपीचा शोध घेण्याबाबत तपास केला असता घटनास्थळावरील सिसिटीव्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदार यांचे कडुन माहीती प्राप्त करून रोहीत राजु सोळंके (वय अंदाजे 18 वर्ष रा. नागे लेआउट कौलखेड अकोला) यास ताब्यात घेवुन गुन्ह्या संबधाने विचारपुस केली असता, त्याने सांगीतले की, मृतक याने रोहीत सोळंके यास दारू पिण्याकरीता पैसे मागीतले. रोहीत याने नकार दिल्याने मृतक याने रोहीत सोळंके सोबत वाद घालुन शिवीगाळ केली. त्याच रागातुन रोहीत सोळंकेने गंगाधर डाबेराव याला काठी व दगडाने डोक्यावर मारहाण करून जिवानीशी ठार मारले असे सांगीतले. यावरून आरोपी रोहीत राजु सोळंके यास पुढील तपास कामी पो. स्टे खदान यांचे ताब्यात देण्यात आले.


सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक  अर्चित चांडक, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला. सहायक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोउपनि. माजीद पठान खान यांच्यासह फिरोज खान, सुलतान पठाण, किशोर सोनाने, खुशाल नेमाडे, उमेश पराये, एजाज अहमद, अभिषेक पाठक, आकाश मानकर, धिरज वानखडे, मो. आमीर, सतीष पवार, राज चंदेल, श्रींकात पातोंड, अशोक सोनवणे,  अक्षय बोबडे तसेच श्वान पथकचे ASI आंनद गायकवाड, किरण अहीर यांनी केली. यात जोया श्वान ने महत्वाची भूमिका पार पाडली.


टिप्पण्या