भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: माउंट कारमेल स्कूलची विद्यार्थिनी अनुष्काराजे एकनाथ वीणा खेडकर हिने आज जाहीर झालेल्या एसएससी बोर्ड परीक्षा निकालात 100% गुण मिळविले आहेत. शंभर टक्के गुण मिळवित अनुष्काराजे हिने शाळेमधून पहिला क्रमांक पटकाविला आहे.
अनुष्कराजे हिने इंग्लिश विषयात 95, संस्कृतमध्ये 100, मराठीत 94, गणितात 100, सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये 98 तर सोशल सायन्स मध्ये 99 गुण मिळविले आहेत.
अनुष्काराजेला व्हायचं इंजिनियर
अनुष्काराजे हिला अभ्यासासोबतच क्रीडा आणि कलागुणांची आवड असून विविध छंद जोपासते. भविष्यात इंजिनिअरिंगची पदवी आयआयटी मुंबई येथून संपादन करण्याचा मानस असल्याचे तिने सांगितले. तिने तिच्या यशाचे सर्व श्रेय गुरुजन वर्गाला दिले आहे.
कुमारी अनुष्काराजे खेडकर हिचे भारतीय अलंकार न्यूज 24 तर्फे अभिनंदन व उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा…
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
मुख्य संपादक,
भारतीय अलंकार न्यूज 24
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा