political-akola-city-shiv-sena: शिवसेनेत कर्तबगार महिलांना संधी मिळणार - वर्षा भोयर यांचे वक्तव्य




ठळक मुद्दे 


*शिवसेना महिला आघाडीची आढावा बैठक


*विविध क्षेत्रातील महिलांचा शिवसेनेत प्रवेश






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: होऊ घातलेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीकरीता सर्वच पक्ष कामाला लागले असून शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात आज महिला आघाडीच्या अकोला जिल्हा संपर्कनेत्या वर्षा भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना महिला आघाडीची आढावा बैठक पार पडली.




महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये मातृशक्तींनी पुढाकार घेवून शिवसेनेला घवघवीत यश प्राप्त करुन द्यावे तसेच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे नेते एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करावे. कार्यतत्पर असलेल्या महिलांना शिवसेनेमध्ये मोठी संधी उपलब्ध असून या माध्यमातुन महिला नेतृत्वांना वाव देण्याकरीता पक्ष कार्यरत आहे. महिलांना राजकारणासोबतच सामाजीक कार्य करण्याची मोठी संधी शिवसेनेने उपलब्ध करुन दिली आहे. याचा महिला पदाधिकार्‍यांनी लाभ घेतला पाहीजे, असे आवाहन यावेळी संपर्कनेत्या वर्षा भोयर यांनी केले. 





यावेळी अकोला जिल्ह्याचे संपर्क नेते गोपीकिशन बाजोरीया, नवनियुक्त जिल्हाप्रमुख नारायणराव गव्हाणकर, चंद्रशेखर पांडे गुरुजी, महिला जिल्हा प्रमुख उषाताई विर्क यांची प्रमुख उपस्थिती होती. 



सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पाहूण्यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. तद्नंतर आपल्या प्रास्ताविकामध्ये जिल्हाप्रमुख उषाताई विर्क यांनी गेल्या तीन वर्षाचा कार्य अहवाल प्रस्तुत केला. 




नवनियुक्त जिल्हा प्रमुख नारायणराव गव्हाणकर तसेच चंद्रशेखर पांडे गुरुजी यांचा महिला आघाडीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. त्यानंतर विविध क्षेत्रातील कर्तृत्वशील महिलांनी शिवसेनेमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश घेतला. 




कार्यक्रमाचे सुत्र संचालन अ‍ॅड. दिपाली जानोरकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रमिला टाले यांनी केले. 




यावेळी महिला आघाडीच्या उप जिल्हा प्रमुख विजया राजपूत, संगीता शुक्ल, ममता जैन, निता अग्रवाल, देवश्री ठाकरे, रेखा राऊत, शितल गिरी, खुशी भटकर, स्वानंदी पांडे, शितल पांडे, निशा ग्यारल, राजेश्वरी शर्मा, रोशनी श्रीनाथ, वसुंधरा नंदागवळी, बबीता गुप्ता, संगीता इंगळे, संगीता कराडकर, रेखा लोखंडे, जयश्री धारपवार, अ‍ॅड. दिपाली जाधव यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.

टिप्पण्या