independence-day-2026-akl: स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात अकोला शहर तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाले!
independence-day-2026-akl: स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात अकोला शहर तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाले!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
f
मुख्य सामग्रीवर वगळाभारतीय अलंकार न्यूज 24
मुंबई: भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्याकरिता मुंबई काँग्रेसच्या वतीने आज 10 मे रोजी जय हिंद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय सशस्त्र दलांच्या निर्णायक कृतीचे जोरदार समर्थन केले. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी वीर जवानांच्या अटळ समर्पणाचा सन्मान करत, काँग्रेस आपल्या निर्भय सशस्त्र दलांसोबत एकजूट आहे, हा संदेश देण्यात आला.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांच्या नेतृत्वाखाली खेरवाडी जंक्शन वांद्रे पूर्व ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिल्हाधिकारी कार्यालय अशी जयहिंद यात्रा काढण्यात आली. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री ॲड Aslam Shaikh , आमदार Amin Patel, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो नागरिक उपस्थित होते.
“पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांना भारतीय सैन्यदल चोख प्रतुत्तर देत आहे. भारतीय सैन्य दलाला मोठा जाज्वल्य व दैदिप्यमान इतिहास आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या आतापर्यंतच्या प्रत्येक युद्धात भारतीय लष्कराने पाकास्तानला पराभवाची धूळ चारली आहे. पण पाकिस्तानच्या कुरापती कमी होत नाहीत. आता पाकिस्तानला चांगला धडा शिकवण्याची वेळ आली आहे आणि भारतीय सैन्य दल पाकिस्तानला अद्दल घडवेल. देशावर आज आलेल्या संकट प्रसंगी आपण नागरिक म्हणून भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे”, असे आवाहन खासदार वर्षा गायकवाड यांनी यावेळी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा