- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ram-navmi-2025-in-akola-city-: राम जन्मला ग सखी राम जन्मला…श्रीराम मंदिरांसह घरोघरी राम जन्मोत्सव साजरा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महापुरुषांच्या जन्मदिनाला अवतरण दिवस असे म्हंटले जाते.जेव्हा जेव्हा जगात अधर्म वाढतो आणि वाईट शक्ती निसर्गाच्या नियमांची उलथापालथ करू लागतात, अशा स्थितीत देव अवतार घेतो, अशी मान्यता आहे. मानवजातीसाठी युगानुयुगे अनुकरणीय ठरेल, असे आदर्श महापुरुष आणि सर्व ऐश्वर्यांसह श्रीराम त्रेतायुगातील चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमीला अयोध्येत अवतरले होते. या दिवसाला 'रामनवमी' असे म्हणतात. ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला असे म्हणतात तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी 12 वाजता झाला. आजही राम जन्म उत्सव देशभरात आनंदाने साजरा केला जातो.
रामनवमीचा उत्सव अनेक ठिकाणी फार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. राम जन्माच्या दिवशी रामजन्म पाळणा अगदी हमखास गायला जातो.
गीत रामायण मधील ‘राम जन्मला ग सखे राम जन्मला’ हे गाणं घरोघरी, चौका चौकात, मंदिरात ऐकायला मिळते. या सोहळ्यामध्ये ग्रंथपठण, रामकथेचे निवेदन, गीत रामायण आधीचे पठण केले जाते. आज सगळीकडे रामनवमीचा उत्सव पाहायला मिळत आहे.
मोठे राम मंदिर
अकोल्यातील श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..मोठा राम मंदिर म्हणून प्रसिद्ध या राम मंदिरात श्री रामाची मूर्ती शेगावचे संत श्री गजानन महाराजांच्या हस्ते स्थापन करण्यात आली आहे. आजच्या या विशेष दिवशी मंदिराचे आकर्षण वाढवण्यासाठी आकर्षक सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे भक्तांना एक अद्भुत अनुभव मिळाला. राम जन्मोत्सव सोहळ्यात भगवान श्रीरामाच्या जन्माच्या निमित्ताने विविध विधी आणि अनुष्ठाने पार पाडण्यात आली. ज्यामध्ये भगवान श्रीरामाच्या जन्माच्या निमित्ताने पूजा-अर्चना आणि आरती करण्यात आली. राम जन्मोत्सव सोहळ्यात सार्वजनिक सहभाग दिसून आला, ज्यामध्ये अकोल्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
या मंदिरात आठवडाभरापासून भजन-कीर्तनाचे आयोजन आणि रामायणाचे पठण करण्यात आले. अनेक भक्तांनी या उत्सवात उत्स्फूर्त आणि लक्षणीय सहभाग घेतला.
मंदिर परिसरात जत्रा
आज या निमित्ताने मंदिर परिसरात परंपरेनुसार मोठी जत्रा सुद्धा भरली. खेळणी,गृहपायोगी वस्तू, सजावटीचे साहित्य, खाद्य पदार्थ, सुगंधी अत्तर, देवी देवतांचे चित्र, मुर्त्या , पूजा साहित्य, धार्मिक पुस्तके ग्रंथ आदी सह विशेष म्हणजे रामफळ आणि उन्हाळयात शरीर स्वस्थासाठी फायदेशीर दवण्याचे रोप म्हणजे मरवा (Davana) ही सुगंधी वनस्पती जत्रेत पहायला मिळाली. दवणा ही वनस्पती धार्मिक कार्यांसाठी आणि औषध म्हणून वापरली जाते. या जत्रेच हे दरवर्षी मुख्य आकर्षण असते. ही वनस्पती खरेदी करण्यासाठीच अनेक जण जत्रेत येतात. कारण वर्षभर ही वनस्पती बाजारात कुठेच दिसत नाही.
राम नवमी निम्मित आज भक्तांनी एकत्रितपणे प्रार्थना केली आणि रामाच्या चरणी नतमस्तक झाले. अकोल्यातील श्रीराम मंदिरात साजरा झालेला राम जन्मोत्सव म्हणजे भक्तांच्या एकतेचा आणि श्रद्धेचा एक अनोखा अनुभव म्हणता येईल जो सर्वांच्या मनात कायमचा ठसा सोडणार आहे, असे राम मंदिर समिती सदस्य गिरीश जोशी म्हणाले.
उन्हाचा तडाखा
दरम्यान अकोला शहरात उन्हाचा तडाखा आज जरा जास्त असल्याने अनेकांनी दुपारी मंदिरात येणे टाळले. मंदिर परिसरात नेहमी पेक्षा गर्दी कमी दिसली. आज 43°c जवळपास पारा चढला आहे. जत्रेतील विक्रेते दुपारी ग्राहकांची वाट पाहत बसले होते.
पहाटे पासून दर्शन
आज अकोला शहरात रामनवमीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे. पहाटेपासूनच शहरातील राम मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या गर्दीचा अंदाज बघता चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
गुढीपाडव्यापासून राम मंदिरात चैत्रोत्सव सुरू आहे. मोठे श्रीराम मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी रामनवमी निमित्ताने दर्शनासाठी गर्दी केली आहे. पहाटे झालेल्या काकडा आरती नंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे.
आज बारा वाजता राम जन्मोत्सव सोहळा राम मंदिरात पार पडला. तत्पूर्वी प्रभू श्रीरामासह सीतामाता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीचे अभिषेक करून पारंपरिक नवीन वस्त्र परिधान करून आभूषणे चढवली गेली. शहरातील विविध भागांमधून भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती.
बंदउ बालरूप सोइ रामू
सब सिधि सुलभ जपत् जिसु नामू
मंगल भवन अमंगल हारी
द्रवऊ सो दशरथ अजिर बिहारी या नावाचा गजर करून श्री संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र मोठ्या राम मंदिरात परिसरात श्री राम प्रभूचा सजीव स्वरूप व राम दरबारची उभारणी करून महाआरती आमदार रणधीर सावरकर, यांच्या हस्ते करण्यात आली.
श्री जानकी वल्लभो सरकार धर्मा संस्था रजिस्टर तसेच श्री रामनगर मित्र मंडळ रामनगर, सागर भारुका मित्र मंडळ, श्रीराम व हरिहर संस्था यांच्या वतीने आज राम जन्मोत्सव निमित्त महाआरती तसेच राम खिचडी चना राजगुरूचे लाडू वितरण करण्यात आले. यावेळी वेदपाठी ब्राह्मण यांच्या हस्ते विशेष पूजा अर्चना करून अकोला पंचक्रोशी येथील नागरिकांच्या सोबत विदर्भातील सर्व नागरिकांच्या कल्याणाची कामना करण्यात आली. यावेळी जयंत मसने, विजय अग्रवाल, सागर भारूका, संजय अग्रवाल, गिरीश जोशी, अनिल मानधने, अजय गुल्हाने, गिरीराज, तिवारी, माधव मानकर,नितीन चितलांगे रामरतन सारडा, नवीन गुप्ता, विलास अनासाने, पप्पू बुलबुले, दीपक शर्मा नितीन जोशी, एपीएमसी जितू शर्मा ,शाम शर्मा, गोलू शर्मा ,धीरज शर्मा, विशाल लड्डा, सागर शर्मा, दीपक महाराज शर्मा, वासुदेव जोशी, कुणाल शर्मा, मनोज शर्मा, अशोक तोष्णीवाल, नितीन ढोले, आशिष शर्मा, आशिष अवधानिया, डी के चाकर, बजरंग शर्मा, संजय जैन, शुभम खाडेकर, रवी खेडेकर, विनय जोशी, राधे भारुका, श्याम शर्मा, तुषार भिरड यांनी कार सेवा करून लाडू तसेच चनाची भाजी प्रसाद वितरण करण्यात आली. अपेक्षा मानधने, साक्षी मानधने, चंदन अग्रवाल, नवनीष अग्रवाल, सुनीता जोशी देवके, मोहन गुप्ता यांनी सुद्धा सेवा प्रदान केली.
प्रसादाचे वाटपश्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था, सागर भारूका मित्र मंडळ, रामनगर मित्र मंडळ यांच्या या उपक्रमात समाजातील सर्व घटक सहभागी झाले. जवळपास 20 हजार भक्तांना प्रसाद वितरण करण्यात आला.
महाआरती करून अभिषेक विशेष पूजा अर्चना करण्यात आली. यामध्ये सुमनदेवी अग्रवाल, विनायक शांडिल्य गुरुजी, विजय अग्रवाल आदी सहभागी झाले होते, वेदपाठी ब्राह्मण महेश जोशी, संतोष शुक्ला, जनक जोशी, महेश कापडी आदी वेद पाठी ब्राह्मण सहभागी झाले होते.
छोटे राम मंदिरात जन्मोत्सव
गांधी रोडवरील प्राचीन छोटे राम मंदिरात धार्मिक विधी सह राम जन्म उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. निनाद कुलकर्णी यांचे किर्तन झाले.
भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. दुर्गा माता मंदिर जवळ श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे गांधी चौकात श्रीराम जन्म सोहळा साजरा करण्यात आला.
घरोघरी पूजन
घरोघरी राम जन्म सोहळा साजरा करण्यात आला. धार्मिक विधी नुसार पूजन करून राम चरित्र रमचरित मानस पठण करण्यात आले. घरोघरी राम धून पहाटे पासून सुरू होती.
आज सायंकाळी भव्य शोभा यात्रा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा