- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
online-betting-case-akola-dist: बार्शिटाकळी ऑनलाईन बेटींग प्रकरण: फरार आरोपीस बेंगळूरु विमानतळ येथुन अटक; LOC द्वारे अटकेची अकोलातील पहिली कारवाई
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: बहुचर्चित बार्शिटाकळी ऑनलाईन बेटींग प्रकरणात अकोला पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील फरार आरोपीस बेंगळूरु विमानतळ येथुन अटक करण्यात आली आहे. LOC द्वारे अटकेची अकोला जिल्हयातील पहिली कारवाई आहे, हे विशेष. अटक केलेल्या आरोपीस आज न्यायालय समक्ष हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. Akola crime news
18 फेब्रुवारी 2025 रोजी पोलीस अधीक्षक अकोला यांचे मार्गदर्शनाने शंकर शेळके, पोलीस निरीक्षक LCB यांना गोपनीय माहीती मिळाल्यावरून पो.स्टे. बार्शिटाकळी हद्दीतील ग्राम येवता ते कातखेड रोडवर कातखेड शिवारात वैभव हॉटेलचे मालक रविंद्र विष्णुपंत पांडे याचे शेतातील तीन मजली इमारतमध्ये पहिल्या व दुस-या मजल्यावर काही इसम मोबाईल, लॅपटॉप द्वारे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विनापरवाना पैश्याचे हारजितचा ऑनलाईन खेळ खेळवितांना मिळुन आले होते. marathi news
या कारवाई मध्ये एकुण 33 आरोपी मिळुन आले होते. आरोपी विरुद्ध पो.स्टे. बार्शीटाकळी येथे 60/2025 कलम कलम 318 (4), 112 (2), 3(5) भारतीय न्याय सहीता सहकलम 4, 5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन मार्गदर्शन केले .तसेच त्यांचे आदेशाने सदर गुन्हयाचा तपास स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांचे कडे देण्यात आला. सदर गुन्हयात घटनेपासुन मुख्य दोन आरोपी फरार होते.
गुन्हयाचा तपास दरम्यान आरोपी महेश बाबाराव डिक्कर याचे त्याचा साथीदार आरोपी मोनीश गुप्ता (रा. पुणे) याचे सोबत ऑनलाईन बेटींग संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच महेश डिक्कर हा ऑनलाईन बेटींग बाबत प्रशिक्षण घेण्यासाठी दुबई येथे गेल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक अकोला यांचे आदेशाने दोन्ही फरार आरोपीतांची तात्काळ पासपोर्ट माहिती करून LOC (लुक आऊट सरक्युलर) उघडण्यात आली होती. तसेच आरोपी यांची तपासात माहिती घेतली असता आरोपी महेश बाबाराव डिक्कर हा नागपुर, चैन्नई, हैद्राबाद, बँगलोर येथुन ब-याचे वेळा श्रीलंका व दुबई येथे गेल्याचे निष्पन्न झाले होते.
आरोपी महेश बाबाराव डिक्कर (रा. लोहारी खुर्द ता. अकोट जि. अकोला) हा दिनांक 06 मार्च 2025 रोजी आंतराष्ट्रीय विमानतळ बेंगळूरू (बेंगलोर) कर्नाटक येथुन विमानाने श्रीलंका येथे पळुन जाण्याचे बेतात असतांना, विमानतळ प्रशासनाकडे LOC (लुक आऊट सरक्युलर) प्राप्त असल्याने आरोपी यास बँगलोर विमानतळावर विमातळ प्रशासन यांनी अडवुन स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचेशी संपर्क केला. त्यावेळी पोलीस अधीक्षक यांचे परवानगीने तात्काळ पोलीस उप.निरिक्षक गोपाल जाधव व पोलीस अंमलदार अब्दुल माजीद यांनी तात्काळ नागपुर येथुन विमानाने रवाना होवुन आरोपीस ताब्यात घेतले.
आज रोजी आरोपीस न्यायालयात हजर केले असता, आरोपीस 10 मार्च 2025 रोजी पर्यंत (चार दिवस) पोलीस कोठडी रिमांड मिळाला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह ,अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरिक्षक शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक गोपाल जाधव, स्था.गु.शा. स.फौ. सुनिल धामोळे (जिल्हा विशेष शाखा) व स्था. गुशा. अकोला येथील अंमलदार अब्दुल माजीद, गोकुळ चव्हाण, रवि खंडारे, अक्षय बोबडे, स्वप्नील खेडकर, धिरज वानखडे, सतिश पवार यांनी केली आहे.
Akola District
barshitakali
Bengaluru airport
First arrest
fugitive accuse
lcb akola
LOC
Online Betting Case
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा