crime-stealing-AC-and-Fridge-: एसी व फ्रिज चोरी करणारा आरोपी जेरबंद; अकोटफाईल येथून मुद्देमाल जप्त




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: नागपुरी जिन परिसरातील गोडाऊन मध्ये ठेवलेला ए सी,फ्रीज अश्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा मुद्देमाल  कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेला असल्याची तक्रार दोन दिवसापूर्वी दुकान मालकाने दिली होती. यावर सिटी कोतवाली पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीस मुद्देमालासह अकोट फाईल परिसरातून अटक केली आहे.



याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे अग्रवाल इलेक्ट्रॉनिक दुकानचे मालक यश संजय अग्रवाल (रा. राधे नगर अकोला) यांनी त्यांचे मालकीचे नागपुरी जिन अकोला येथील त्यांचे गोडाउन मध्ये ठेवलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तु एसी, फ्रीजची नेहमीप्रमाणे २६ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पाहणी केली. मात्र यावेळी गोडाउन मधील माल हा कमी दिसत असल्याचे त्यांचे निदर्शनात आले. त्यावर दुकान मालकाने आलेल्या स्टॉक लिस्टची पाहणी केली तर त्यांचे लक्षात आले की, गोडाउन मधुन एल जि १.५ टन ३ स्टार डयुल ईव्हर्टर (इनडोअर व आउट डोअर पुर्ण सेट) चे एकुण ०६ नग प्रत्येकी किंमत अंदाजे ४५०००/- रू एकुण २,७०,०००/- रू,  एल जि १.५ टन ५ स्टार डयुल ईव्हर्टर (इनडोअर व आउट डोअर पुर्ण सेट) चे एकुण ०१ नग कि.अं.५५,०००/- रू, एक एल जि फ्रीज २०१ लिटर किं.अं. २५,०००/- रू, एक एल जि चे फ्रीज १८५ लिटर कि.अं.२०,०००/-रू असा एकुण ३,७०,०००/- रू चा मुददेमाल गोडाऊन मध्ये नसल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. ०१ फेब्रुवारी २०२५ ते २६ मार्च २०२५ रोजी या कालावधील कोणीतरी अज्ञात इसमाने गोडाउन मधुन एसी, फ्रीज चोरून नेले असल्याची तक्रार नोंदविली. अग्रवाल यांच्या  फिर्याद वरून पो.स्टे. सिटी कोतवाली अकोला येथे अप.नं. ८०/२०२५ कलम ३०५ (अ) बी.एन.एस प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला होता.


हा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता डी.बी पथकाला सुचना देवून पथक रवाना केले होते. घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करून ठाणेदार सुनिल वायदंडे व डी बी पथक यांना मिळालेल्या गुप्त माहीती वरून  अनोळखी इसम हा अकोट फाईल अकोला या परीसरात राहत असल्याची खात्रीलायक माहीती मिळाली. गुप्त माहीतीच्या आधारे तपासाचे चक्रे फिरवुन संशयीत आरोपी मोहम्मद रफीक मोहम्मद युसुफ (वय २३ वर्षे रा. भारत नगर अकोट फाईल अकोला) यास ताब्यात घेवुन त्याची कसुन चौकशी केली. चौकशीत त्याने सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र आरोपीस विश्वासात घेवुन पुन्हा कसुन चौकशी केली असता, त्याने गुंन्हयाची कबुली दिली.  


गुन्हयात चोरी केलेला मुददेमाल एल जि १.५ टन ३ स्टार डयुल ईव्हर्टर (इनडोअर व आउट डोअर पुर्ण सेट) चे एकुण ०६ नग प्रत्येकी कि.अं.४५०००/- रु एकुण २,७०,०००/- रू, एल जि १.५ टन ५ स्टार डयुल ईव्हर्टर (इनडोअर व आउट डोअर पुर्ण सेट) चे एकुण ०१ नग कि.अं.५५,०००/- रू,  एक एल जि फिज २०१ लिटर किं.अं.२५,०००/- रू,  एक एल जि चे फिज १८५ लिटर कि.अं.२०,०००/- रू असा एकुण ३,७०,०००/- रू चा मुददेमाल हा काढुन दिला.  पोलिसांनी हा मुददेमाल जप्त करून आरोपीस २८ मार्च २५ रोजी अटक कार्यवाही करून गुन्हा उघडकीस आणला आहे.



ही कार्यवाही बच्चन सिंह, पोलीस अधिक्षक अकोला, अभय डोंगरे अप्पर पोलीस अधिक्षक, सतिष कुळकर्णी  उपविभागीय पोलीस अधिकारी शहर  अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. सुनिल वायदंडे, स.पो.नि. किशोर पवार, डी.बी. पथक अंमलदार पोहेकॉ आश्विन सिरसाट, अजय भटकर, ख्वाजा शेख, किशोर येउल, पो. कॉ. निलेश बुंदे, शैलेश घुगे पो. स्टे. सिटी कोतवाली यांनी केली. गुन्हयाचा पुढील तपास पोहेकाँ अश्विन सिरसाट हे करीत आहेत.



टिप्पण्या