- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महानगरातील विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते एड. मो. इल्यास शेखानी यांना दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड 2025 ने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
फिल्ममोरा मीडिया नेटवर्कच्या अखिलेश सिंग यांच्या वतीने मुंबई येथील सहारा स्टार सभागृहात आयोजित या पारितोषिक वितरण सोहळ्यात नागिन सिरिअलची अभिनेत्री अदा खान यांच्या हस्ते व सिने क्षेत्रातील यामिनी मल्होत्रा, कृष्णा पाटील,काजल चौहान, मुग्धा चाफेकर, नवीना वाडेकर, खुशी माळी, स्नेहा भावसार, सना सुरी आदी अभिनेत्रीच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत एड.शेखानी यांना मानाचा दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड 2025 प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
Tarak mehta ka utha chasma ki bawri and sonu bhide
एड. मोहम्मद इल्यास मोहम्मद हारून शेखानी हे गत पंधरा वर्षापासून सामाजिक सेवेत सक्रिय असून ते अकोला बार असो. चे माजी सचिव, हाशम शेठ ट्रस्टचे ट्रस्टी, अकोला कच्ची मेमन जमातचे माजी उपाध्यक्ष, रोटरीचे माजी सदस्य तथा यंग इंडिया बिजनेस क्लबचे सदस्य म्हणून सेवारत आहेत. त्यांच्या सामाजिक सेवेची उल्लेखनीय कामगिरी बघता त्यांना मानाचा दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा