- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: श्री जानकी वल्लभो सरकार धर्माथ संस्था तर्फे संत गजानन महाराज द्वारा स्थापित शताब्दीपूर्व मोठ्या राम मंदिरात आज विशेष पूजा अर्चना करण्यात आली. श्रीराम जानकी विवाह सोहळा निमित्त भगवान रामांना सीता यांना वस्त्र भेट करण्यात आले. तसेच महाआरती, दीपदान, 111 तुपाचे दिवे लावून सर्वांच्या मनोकामना पूर्तीची प्रार्थना करण्यात आली.
श्री प्रभू राम जानकी विवाह तसेच बाके बिहारी प्रगट दिवस, शौर्य दिवस असा तिहेरी योग. शुक्रवार महालक्ष्मीचा दिवस पंचमी पवित्र मार्गशीर्ष महिन्यातील इच्छापूर्तीच्या दिवशी काग भूषण रामायणाचा पठण महाआरतीच्या माध्यमातून अकोलेकरांच्या इच्छापूर्ती समाजातील सर्व स्तरातील नागरिकांच्या सनातन धर्माची पताका अविरतपणे तसेच बंगला देशामध्ये हिंदू नरसाहार व मंदिरांची तोडफोड बंद व्हावी तथाकथित मानवतावादी, धर्मनिरपेक्ष वादी म्हणून घेणारे गप्प असल्यामुळे अशा तत्वांना ईश्वर सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी अनिल नंदलाल मानधने यांच्या हस्ते पूजा अर्चना करण्यात आली.
वृंदावन बाके बिहारी यांचा प्रगट्य दिवस हा श्रीराम जय राम जय जय राम हरे राम हरे राम हरे कृष्णा या मंत्रोच्चाराने वेदपाठी ब्राह्मण हेमंत शर्मा, चंद्रशेखर खडसे, जनक जोशी, संतोष शुक्ला, राजू मिरेकर, जनक शर्मा सतीश जोशी सौरभ छंगानी यांच्या मंत्रोच्चाराने पूजा अर्चना करण्यात आली.
यावेळी गिरीश जोशी गिरीराज तिवारी विलास अनासने, पुष्पा वानखडे, मीरा वानखडे, कोमल बोरीकर, शांतीलाल चौरसिया, किरण शाह, महेंद्र खंडेलिया, योगेश शर्मा, सागर शर्मा, संगीता केजडीवाल, कोमल बोरकर, शंकर बोरकर, शांतादेवी अग्रवाल, आशा जोशी, शंकर जोशी, अजय गुल्हाने, माधव मानकर, राम ठाकूर, मधुकर कुलकर्णी, यज्ञेश गांधी, गोपाल पुरोहित, शंकर पाटील, सुरेश यादव, महावीर तिवारी, राधा तिवारी, मुन्ना दुबे, रमेश मिश्रा, सुरेश बखारिया आदी प्रामुख्याने विशेष पूजा अर्चना मध्ये भाग घेतला.
...............................
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा