- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
lavani-queen-mayuri-utekar-dj: लावणी क्विन मयुरी उतेकर रविवारी अकोल्यात; शहरात प्रथमच ‘डि जे लावणीचा कोल्हापुरी तडका’
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
photo: Mayuri Utekar insta
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: राज्यात सध्या लावणीच्या दुनियेत गौतमी पाटील धुमाकुळ घालत असली तरी लावणी क्वीन मयुरी उतेकरही तिच्या तोडीस तोड आहे. मयुरी उतेकर देखील सध्या प्रचंड फॉर्मात आहे. लावणी डान्सर म्हणून तिने गौतमीसोबत अनेक शो केले आहेत. अशी लावणी क्वीन मयुरी उतेकर अकोला शहरात रविवार 8 डिसेंबर रोजी येत आहे. याच दिवशी सायंकाळी 7:30 वाजता तिचा ‘डी जे लावणी कोल्हापुरी तडका’ हा बहारदार कार्यक्रम होणार आहे.
पारस्कर टाटा मोटार शो रूम, स्टेटस लॉन, राधास्वामी डेरा समोर अकोला येथे या धमाकेदार लावणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अरुण रूम यांच्या आयोजनात हा कोल्हापुरी तडका लावणी कार्यक्रम होणार आहे.
लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांची सहकलावंत मयुरी उतेकर यांचा लावणीचा कार्यक्रम अकोल्यात प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची तिकीट विक्री ‘शिवाय’ फ्लेक्स प्रिंटिंग तहसील कार्यालय समोर आणि पारसकर टाटा मोटर शो रूम येथे सुरू आहे. तिकीट दर 1050 रूपये आणि 600 रुपये असा आहे. तसेच ऑनलाईन बुकींग सुविधा उपलब्ध आहे. अकोलेकरांनी या बहारदार लावणी नृत्य सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
लावणी क्वीन मयुरी उतेकरची इंस्टाग्रामवर फॅन फॉलोईंग मोठी आहे. सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी तिचे लावणी कार्यक्रम होत आहे. कमी वयात तिने लावणी क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अदांचे लाखो दिवाणे आहेत. अशीही लावणी क्विन मयुरी उतेकर रविवार 8 डिसेंबर रोजी अकोलेकर कलाप्रेमिंच्या भेटीला येत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा