- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आरोपींतर्फे वकील



ठळक मुद्दा
पोलीस स्टेशन रामदासपेठ येथील पोलीस अंमलदार यांचे शासकीय कामात अळथळा निमार्ण करणा-या 08 आरोपींचा जमानत अर्ज मंजूर
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: पोलीस अंमलदार यांना धक्काबुक्की करुन मारहाण करीत शासकिय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आठही आरोपींना आज अकोला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी आरोपींनी जमानत अर्ज न्यायालयात सादर केला होता. आठही आरोपींना न्यायलयाने जामीन मंजुर करण्यात आला.
23 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता अकोला पश्चिम मतदार संघात महाराष्ट्र विधानसभा मध्ये कॉग्रेस पक्षाचे उमेदवार साजिद पठाण यांच्या विजयी जल्लोष काही नागरीक करीत होते. दरम्यान टिळक मार्ग माळीपुरा परीसरात कर्तव्यावर असलेल्या पोलीस अमलदार यांना त्यांचे कर्तव्यामध्ये अडथळा निर्माण करून काही लोकांनी त्यांना मारहाण केली. मारहाण केल्याच्या आरोपावरून आठ आरोपींना पोलीसांनी 24 नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले. कलम ,132, 3 (5), 189 (2), 189 (3) (5), 191 (2), 190 बि.एन. एस. सहकलम 135 म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
या प्रकरणामध्ये आज अकोला न्यायालयात सर्व आठ आरोपींना हजर करण्यात आले. सर्व आरोपींतर्फे वकिलांनी जामिन अर्ज दाखल केला. आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून मुख्य न्याय दंडाधिकारी अकोला यांनी रूपये 20,000 च्या जामिनावर सोडण्याचे आदेश केले.
सर्व आरोपीतर्फे ॲड. अयुब नौरंगाबादे, ॲड. अलिरजा खान, ॲड. इम्ररान कुरेशी, ॲड. अब्दुल शफिक, ॲड. सादातअली देशमुख, ॲड. मोहम्मद मुद्रसीर, ॲड. आमिर खान, ॲड. अहमद रजा खान यांनी बाजू मांडली.
याबाबात सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुक मतमोजणीच्या दिवशी शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास अकोला पश्चिम मतदार संघात काही इसम टिळक मार्ग माळीपुरा चौक परिसरात रस्त्यावर उतरून जल्लोष करीत होते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. याबाबत तेथे कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार यांनी या लोकांना समजावले. मात्र या जमावाने पोलीस अंमलदार यांनाच मारहाण करण्यास सुरूवात केली. घटने नंतर याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या प्रकरणातील सर्व दोषींवर अकोला पोलीसांनी कारवाई केली असून, काल रविवारी रामदास पेठ पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली. पोलिसांनी या आरोपींना अटक करुन रस्त्याने पायी चालवत नेले.
पो.स्टे. रामदासपेठ, अकोला येथील पोलीस अंमलदार हे 23 नोव्हेंबर रोजी त्याचे कर्तव्य बजावत असतांना आरोपीतांनी संगनमत करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. त्याबाबत तात्काळ पोलीस स्टेशन रामदासपेठ, अकोला येथे फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून अपराध क्रमांक 406/2024 कलम 132,3 (5) बि.एन.एस प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला होता.
गुन्हयाच्या तपासात घटनास्थळावरील व्हिडीओची पाहणी केली असता, घटनेत 05 पेक्षा जास्त आरोपीतांचा सहभाग निष्पन्न झाला. आरोपीतानी बेकायदेशीर जमाव जमवुन सामुहीक इरादयाने फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्हयात कलम 189(2), 189(3) (5),191(2), 190 बि.एन.एस सहकलम 135 मपोकों प्रमाणे वाढ करण्यात आली होती.
गुन्हयातील आरोपीतांना गुन्हयात अटक करणे कामी पोस्टे स्तरावर वेगवेगळे पथक तयार करून घटनास्थळावरील सि.सि.टी.व्ही व गोपनीय बातमीदारच्या मदतीने नमुद गुन्हयातील 08 आरोपीतांना 24 तासांच्या आत अटक करण्यात आली होती.
यामध्ये आरोपी तौफीक खान शब्बीर खान (वय 34 वर्ष रा. संजय नगर मोहम्मदीया मस्जीद जवळ नायगाव अकोला), मोहम्मद अबुबखर रफीक कुरेशी (वय 25 वर्ष रा. कागजीपुरा अकोला), मोहम्मद आदील खत्री मोहम्मद अख्तर खत्री (वय 27 वर्ष रा. कागजीपुरा अकोला), इरशाद हुसेन लियाकत हुसेन (वय 30 वर्ष रा. इनामपुरा अकोला), अब्दुल सादीक अब्दुल बशीर (वय 32 वर्ष रा. संजय नगर इक्बाल कॉलनी अकोला), अजीम खान इकबाल खान (वय 32 वर्ष रा. लालसाहेब चौक काळी मस्जीद जवळ, अकोला), जावेद खान जिलानी खान (वय 29 वर्ष रा. भारत नगर अकोट फाईल अकोला), सैयद अशरफ सैयद मकसूद (वय 70 वर्ष रा. अल्लु पहेलवान याचे घरा जवळ नवाबपुरा अकोला) यांना अटक करण्यात आली होती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा