murtijapur-assembly-elections: सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत सुगत वाघमारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ सुगत वाघमारे यांनी आज 29 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 



डॉ. वाघमारे यांनी सर्व थोर महापुरुषांना अभिवादन करून, ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने वंचित बहुजन आघाडी तर्फे मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघासाठी युवा नेते सुजात आंबेडकर, प्रतिभा अवचार, बालमुकुंद भिरड, ॲड. संतोष राहते आदींच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय कार्यालय मुर्तीजापुर येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी सूजात आंबेडकर यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सबोधित केले.






यावेळी पक्षातील नेते, कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.






टिप्पण्या