murtijapur-assembly-elections: सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणजे भाजपचे हरिष पिंपळे - सुगत वाघमारे यांचा टोला




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणजे भाजपचे हरिष पिंपळे असा टोला वंचित बहुजन आघाडीचे मुर्तिजापूर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुगत वाघमारे यांनी लगावला आहे.


काही दिवसांपूर्वी हरिष पिंपळे यांनी आपल्या जाहीर भाषणात आपण 15 वर्षात घरच्यांसाठी खूप काही केलं असून आता जनतेसाठी काम करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. तर हरीश पिंपळे यांनी 15 वर्षे घर भरलं असून आता पुढील 5 वर्ष कार्यकर्त्यांना समर्पित करणार असून नंतर जनतेचा विचार करणार असा टोला सुगत वाघमारे यांनी लगावला आहे.



वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती योग्य नसल्याने त्यांच्या तब्येतीची काळजी असल्याने प्रचारासाठी त्यांना आम्ही त्रास देत नसल्याचही सुगत वाघमारे म्हणाले.



दरम्यान सुगत वाघमारे यांनी आपल्या प्रचारार्थ संपूर्ण मुर्तिजापूर मतदार संघ पिंजून काढला असून, मतदारांशी संवाद साधत आहे. तर डॉ. सुगत वाघमारे यांच्या प्रचारार्थ उद्या मा. ॲड. प्रकाश आंबेडकर यांची कुरणखेड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.




टिप्पण्या