- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: हॉटेल सेंटर प्लाझा येथे आज आगामी विधानसभेच्या अनुषंगाने सकल उत्तर भारतीय महासंघ यांची संवाद बैठक संपन्न झाली. बैठकीला उपस्थित राहुन महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय अग्रवाल यांनी उत्तर भारतीय महासंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
भाजपच्या शासनामुळे उत्तर भारतीय समाजाच्या कल्याणासाठी अनेक उपाययोजना राबविल्या गेल्या आहेत, आणि भविष्यातही त्यांची प्रगती व सुरक्षिततेसाठी भाजप कटिबद्ध आहे त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला भाजप ला मतदान करुन विजयी करा, असे आवाहन विजय अग्रवाल यांनी केले.
यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, खा. अनुप धोत्रे, पश्चिम विधानसभा,भाजप महानगर अध्यक्ष जयंत मसने, आ. वसंत खंडेलवाल, रामप्रकाश मिश्रा, अनुप शर्मा, अरविंद शुक्ला, दिलीप मिश्रा, चेतन भार्गव, सुजित ठाकूर, संतोष पांडे, विजय ठाकूर, अनिल यादव, धर्मेंद्र यादव, मनोज बिसेन, मनीष बिसेन, विनोद ठाकूर, अमरेश शुक्ला, कृष्णा पांडे, मनोज साहू, विजय ठाकूर, रवी यादव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा