akola-west-assembly-election: विजय अग्रवाल यांच्या प्रचारार्थ भवानी पेठ, कृषि उत्पन्न बाजार समिती, वानखडे नगर येथे संवाद सभा




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालण्याचा रूढ संकल्प केला आहे. तसेच अकोल्यात विकास कामांमध्ये विजय अग्रवाल कोणताही भेदभाव न करता मागासवर्गीय वस्तींमध्ये निधी उपलब्ध करून भेदभाव न करता विकास केल्यामुळे आपण महायुतीचे उमेदवार यांच्या प्रथम क्रमांकाच्या बटनाचे दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन माजी उपमहापौर सुनील मेश्राम यांनी केले. 


विजय अग्रवाल यांच्या प्रचारार्थ शहरात दहा ठिकाणी सभा घेऊन जनसंपर्क मोहीम राबविली. भवानी पेठ, अकोट फाईल, मोहता मिल, तार फैल, वाशिम नाका शहरातील विविध भागांमध्ये त्यांनी जनसंपर्क साधून समाजातील सर्व घटकांना शहराच्या विकासासाठी महायुतीच्या पाठीशी उभे राहून विजयी करण्याचे आवाहन केले. 


ठिकठिकाणी छोट्या खानी बैठका घेऊन सध्याची अकोल्याची राजकीय परिस्थिती यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. 


यावेळी माजी नगरसेविका माधुरी मेश्राम, माजी नगरसेवक अनिल मेश्राम, ॲड. सत्यनारायण  जोशी, अजय तिवारी, राजेश तिवारी, अरुण डावरे, मुकेश राशी, कुंदन तिवारी ,शाम देवरे, लखन राजपूत, ओमप्रकाश शर्मा, निलेश बोर्डे, लखन कोशल, हितेश पातालवंशी, मोहन यादव, शुभम यादव ,  आशिष ठाकरे मोहन खंडागळे भारत यादव श्याम ठाकूर गिरणार घुगे संजय खर्च किरण मेश्राम, नंदू  कदम , धनंजय ठाकूर मुकेश राऊत प्रमोद तायडे गजानन दराडे महादेवराव राऊत बापू देशमुख राजेंद्र जाधव निलेश मेश्राम संजय लांजेवार निलेश शर्मा प्रमोद येवले एडवोकेट गांधी सुरेश जाधव संजय दास आदी कार्यकर्ते यांनी प्रचार मोहीम राबवून महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले. 


गोपाल नागापुरे शशी चोपडे अरविंद शुक्ला पवन महल्ले प्रशांत कदम सुमित मौर्य रोहित गुप्ता आशु ठाकूर आकाश कवाडे राम ठाकूर अमित मडकू अनुप जाधव अविनाश शर्मा शनी गवली रोशन मौर्य आदी प्रामुख्याने प्रचार मोहिमेमध्ये सहभागी होते





कृषी उत्पन्न बाजार



शेतकऱ्याला  कर्जमाफी देण्याचे अभिवचन देणारे तसेच व्यापाऱ्यांच्या हितासाठी सतत व सर्वांना सदैव उपलब्ध राहणारे आमदार रणधीर सावरकर विजय अग्रवाल या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश बेले यांनी केले. आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महायुतीच्या उमेदवारां यांच्यानी शेतकरी आणि  व्यापारी, अडतिया यांच्या भेटीगाठी घेतल्या.  महायुतीच्या विरोधात पोस्ट टाकून मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा काही प्रयत्न होत असला तरी शेतकरी व्यापारी अडतिया, भाजपा महायुतीच्या पाठीशी आहे, असेही राजू शर्मा यांनी सांगितले. 


यावेळी आमदार रणधीर सावरकर विजय अग्रवाल यांच्यासोबत अशोक गुप्ता. वसंत बाछूका,राजेश बेले,संदीप चौखंडे, राजीव शर्मा,वैभव माहोरे, विजय चतरकर,दिवाकर पाटील,स्वप्नील गावंडे, अतुल संगवी,ओम गोयनका, विष्णू केडिया, देवेंद्र सारडा,राजेश वैद्य, जुनेद बेनीवाले,सतीश राठी,रणजित गावंडे, पवन शर्मा,रमाकांत अग्रवाल, सुनील गोयनका,गोविंद जाजू,मदन ठाकरे व बाजार समिती मधील सर्व व्यापारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वानखडे नगर


विकसित महाराष्ट्र हे विकसित भारत संकल्पनेचा सर्वात मोठा घटक आहे लाडक्या बहिणीच्या प्रत्येक महिन्याला पंधराशे वरून 2100 रुपये देण्यात येईल आणि महिलांमध्ये आर्थिक साऱ्याक्षता निर्माण करण्यासाठी मला प्रशिक्षण देऊन सुरक्षेसाठी 25000 महिलांचा पोलीस दलात समावेश करण्याचा इतिहासिक निर्णय महायुतीने घेतला आहे या निर्णयामुळे तसेच शेतकरी कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12000 रु 15000 रुपये तसेच भावांतर योजना लागू करण्याचा इतिहासिक निर्णय महायुतीने घेतला यामुळे शेतकरी आणि मातृशक्ती युवाशक्ती अन्न आणि निवारा वृद्ध पेन्शन युवकांना रोजगार ग्रामीण भागात पालन रस्ते अंगणवाडी आशा सेविकांच्या विमा संरक्षण वीज विलास 30 टक्के कपात 100 दिवसाचा विजन महाराष्ट्र करण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे त्यामुळे अकोला पश्चिमचे उमेदवार विजय अग्रवाल यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी केले. वानखडे नगर येथे सभेत ते बोलत होते.


यावेळी विजय अग्रवाल विलास शेळके अजय रामटेके संदीप पवार बाबुराव चौधरी मनोज गायकवाड निलेश निनोरे रामन शंकर वसंत मानकर रवी दुतोंडे संजय जीरापुरे पवन महल्ले आदिश मित्र मंडळ युगंधर मित्र मंडळ रामराज प्रतिष्ठान शिवशंभू मित्र मंडळ रुद्र हनुमान मंडल संभाजी चौक मित्र मंडळ चे पदाधिकारी संवाद आशीर्वाद सभेत उपस्थित होते. यावेळी विजय देशमुख यांनी सध्याच्या अकोल्याच्या परिस्थितीवर प्रकाश टाकून महायुतीचे उमेदवार विजय अगरवाल यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.



उत्तर भारतीय समाज


अकोला उत्तर भारतीय समाज हा परंपरागत भाजपाचा मतदार असून महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे, आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विजय अग्रवाल यांना विजयी करण्याचा आवाहन केला आहे. त्यामुळे उत्तर भारतीय समाज खंबीरपणे विजय अग्रवाल यांना विजयी करेल, असा विश्वास रामनवमी शोभायात्रा समितीचे माजी अध्यक्ष व उत्तर भारतीय समाजाचे नेते जयप्रकाश मिश्रा यांनी केले. 


यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे विजय अग्रवाल जयंत मसने आमदार वसंत खंडेलवाल प्राध्यापक अनुप शर्मा अरविंद शुक्ला दिलीप मिश्रा चेतन भार्गव सुजित ठाकूर संतोष पांडे विजय ठाकूर अनिल यादव धर्मेंद्र यादव मनोज भिसे मनुष्य अभिषेक विनोद ठाकूर राजेश मिश्रा परमेश शुक्ला कृष्णा पांडे मनोज शाहू विजय ठाकूर रवी यादव आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 


तीर्थक्षेत्राचा विकास करून नंदनवन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बुलडोजर बाबा योगी आदित्यनाथ यांच्या विचारसरणीने तसेच स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांच्या विचाराने सर्व उत्तर भारतीय समाज सनातन धर्मासाठी आणि राष्ट्रीयत्वासाठी भारतीय जनता पक्षाच्या शिवसेना महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांना अकोला पश्चिम उत्तर अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार रणधीर सावरकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करेल, असा विश्वास यावेळी रामप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केला. 


यावेळी खासदार धोत्रे यांनी अकोल्यातून अयोध्या व वाराणसी साठी रेल्वे सुरू होणार, असे अभिवचन दिले. तसेच उत्तर भारतीय समाजासाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजपाने केलेल्या अभिवचना असून अनुसार पूर्तता करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असे यावेळी सांगितले. 


यावेळी विकासाचा आराखडा एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात सुरू असून अकोला शहरांमध्ये अनेक सुविधा उपलब्ध झाल्या असून सिटी बस सुरू होणार आहे. तसेच नवीन मेन हॉस्पिटल ची उभारणी होऊन तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा शासकीय वेदकीय महाविद्यालयात नवीन इमारत उभारणीचं काम सुरू आहे. सांस्कृतिक भवन तहसील कार्यालय क्रीडा संकुल जलतरण तलाव आशियाच्या धर्तीवर उभारणीचं काम सुरू आहे रस्ते आणि सामाजिक दायित्व म्हणून या निवडणुकीमध्ये भाजपाच्या विरोधात सर्व एकत्र येऊन पराभूत करण्यासाठी येत आहे. हा राज राजेश्वर नगरीचा अपमान करण्याचा प्रकार सुरू असून याचा बदला घेण्यासाठी वेगवेगळे रूप घेऊन निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना  पराभूत करून राजराजेश्वरच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले. यावेळी वसंत खंडेलवाल तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भोपाल इथून आलेले चेतन भार्गव यांनी प्रभावीपणे आपले मत मांडले.




टिप्पण्या