- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
navdurga-festival-2024-akola-: नवदुर्गा उत्सव, धम्मचक्र प्रवर्तनदिन उत्सव तयारीबाबत बैठक; उत्सवाच्या परवानगीसाठी महापालिकास्तरावर ‘एक खिडकी’
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
सोशल मीडियाचा सजग व विवेकी वापर करावा-जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांचे आवाहन
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : जिल्ह्यात 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान नवदुर्गा उत्सव, विजयमादशी, धम्मचक्र प्रवर्तन दिन आदी सणांच्या कालावधीत शांतता व सलोखा राहील यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. सोशल मीडियावरून तेढ निर्माण होईल असे संदेश प्रसारित होऊ नयेत. त्यासाठी सोशल मीडियाचा सजग व विवेकी वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी आज येथे केले.
नवरात्री, विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या अनुषंगाने पूर्वतयारी, कायदा व सुव्यवस्था आदींबाबत विविध सार्वजनिक मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधिक्षकांच्या उपस्थितीत नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, विविध मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उत्सव काळात सोशल मीडियाचा सजग वापर होणे आवश्यक आहे. काही समाजविघातक घटकांकडून दोन जातींत किंवा धर्मांत तेढ वाढविणा-या पोस्ट प्रसारित करण्यात आल्याची यापूर्वीची उदाहरणे आहेत. असे कुठेही घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचवेळी नागरिकांनीही अशा पोस्टवर विश्वास ठेवू नये. त्या फॉरवर्ड करू नयेत. अनेकदा अशा पोस्ट जुन्या किंवा इतर ठिकाणावरील असतात. वास्तवाचा विपर्यास त्यात असू शकतो. त्यामुळे ‘फॅक्ट चेक’ केली पाहिजे. वास्तवाची पडताळणी न करता पोस्ट व्हायरल करणे टाळावे. काही आक्षेपार्ह निदर्शनास आल्यास पोलीस ठाण्यात तत्काळ कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, सामाजिक सलोखा राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. उत्सव काळात नागरिकांसाठी सर्व सेवा सुरळीत राहतील, याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी. विसर्जन मार्गावरील खड्ड्यांची दुरूस्ती करावी. वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. जिल्ह्यात सर्व पथदिवे सुरू असावेत. रस्त्यात लोंबकळणा-या इंटरनेट तारा, केबल हटवाव्या. विविध परवानग्यांसाठी महापालिकेच्या वतीने एक खिडकी सुरू करण्यात आली आहे. बाळापूर, गांधीग्राम येथील विसर्जन घाटावर वीज, पाणी व आवश्यक सुविधा पुरवाव्यात. पोलीसांनी आवश्यक ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्सव आयोजन समितीला पोस्टर, बॅनर, पताका आदी विविध बाबींसाठी परवानगी देताना त्यावर कालमर्यादा स्पष्ट करावी, अशी सूचना श्री. डोंगरे यांनी केली.
यावेळी उपस्थित नवदुर्गा उत्सव, गरबा समितीच्या प्रतिनिधींनीही मनोगत व्यक्त केले.
नवरात्रोत्सव – 2024 करिता 30 सप्टेंबर पासून मनपात एक खिडकी कार्यान्वीत
अकोला शहरात नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो व शहरातील सार्वजनिक ठिकाणी नवदुर्गा उत्सव मंडळांव्दारे मंडप उभारून देखावे तयार करण्यात येत असतात. त्यासाठी त्यांना नियमानुसार मंडप परवनागी, विद्युत जोडणीसाठी महावितरणची परवानगी, लाउडस्पीकरसाठी पोलीस विभागाची परवानगी, रस्त्यालगत मंडप उभारणीकरीता शहर वाहतुक विभागाची परवानगी तसेच महानगरपालिका नगररचना, अग्निशमन व बांधकाम विभागाची परवनगी घेणे अनिवार्य असते, शहरातील सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळांना वरील परवानग्या मिळणे अधिक सोईचे व्हावे याकरिता पोलीस प्रशासन, महावितरण व महागनरपालिका प्रशासन, (धर्मदाय आयुक्त वगळून) वतीने देण्यात येणा-या सर्व परवनग्या एकाच ठिकाणी देण्याकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिका डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे एक खिडकी योजना 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेमध्ये कार्यान्वीत करण्यात आली आहे.
शहरातील सर्व नवदुर्गा उत्सव मंडळांच्या पदाधिकारी यांना अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी एक खिडकी योजनेचा लाभ घेऊन नवदुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी लागणा-या सर्व परवानग्या घेउन हा सण पर्यावरणपूरक व उत्साहाने साजरा करावा.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा